Sunday, 20 October 2019

जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे यांनी बजावला मतदानाचा हक्क


वि.स. वृत्त : 69                                                       दिनांक : 21 ऑक्टोंबर, 2019

जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे यांनी बजावला मतदानाचा हक्क

उस्मानाबाद,दि.21: विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीकरीता 242-उस्मानाबाद मतदार संघात आज सकाळी 7 वाजेपासून मतदानास सुरुवात झाली. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे यांनी उस्मानाबाद येथील (342) नगर पालिक शाळा क्र. 4 या मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.
****
वि.स. वृत्त :70                                                        दिनांक : 21 ऑक्टोंबर, 2019

जिल्ह्यात सखी मतदान केंद्रासह सक्षम आणि आदर्श मतदार केंद्राची स्थापना
उस्मानाबाद,दि.21: मतदाराचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढावा यासाठी लोकसभा निवडणूकीपासून निवडणूक आयोगामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार उस्मानाबाद जिल्ह्यात 8 सखी मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
जास्तीत जास्त मतदारांनी मतदानात सहभाग घ्यावा, मतदानाचे प्रमाण वाढवे यासाठी निवडणूक प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जातात. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही सखी मतदान केंद्राची स्थापाना करुन सदर केंद्राची आकर्षक सजावट करत हिरकणी कक्ष आदीची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.
याशिवाय ‍जिह्यात 4 आदर्श आणि 4 सक्षम मतदान केंद्राची  देखील स्थापना करण्यात आली असून  सदर मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावर मतदारांच्या स्वागतासाठी कमान, आकर्षक रांगोळी, सजावट, आकर्षक संदेशाचे फलकाद्वारे या मतदान केंद्राची सजावट करण्यात आलेली आहे. शहरासह जिल्ह्यात विविध मतदारसंघात अशी मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. या आकर्षक मतदान केंद्रावर करण्यात आलेली आकर्षक सजावट व स्वच्छतेमुळे मतदार उत्साहित दिसत होते. यावेळी मतदान केंद्रावर नव मतदार, ज्येष्ठ नागरिक आणि महिला मतदारांनी देखील उत्साहाने मतदान करत असल्याचे चित्र होते.
****









Thursday, 17 October 2019

स्थिर सर्वेक्षण पथकामार्फत आतापर्यंत 71 लाख रुपये जप्त


वि.स. वृत्त : 62                                                       दिनांक : 17 ऑक्टोंबर, 2019

स्थिर सर्वेक्षण पथकामार्फत आतापर्यंत 71 लाख रुपये जप्त
उस्मानाबाद,दि.17: विधानसभा निवडणूक आचारसंहिता जारी झाल्यानंतर स्थिर सर्वेक्षण पथकामार्फत चार ही विधानसभा मतदार संघात वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत स्थिर सर्वेक्षण पथकाने विविध ठिकाणी कारवाई करुन सुमारे 71 लाख रुपये जप्त केले आहेत.
यामध्ये 11 ऑक्टोंबर रोजी सांजा सुतगिरणी, सांजा रोड येथे महमंद शरीफ बागवान रा. ख्वाजा नगर, उस्मानाबाद हे त्यांच्या सहकाऱ्या सोबत वाहन क्र. एम एच 25 आर 6041 या वाहनातून उस्मानाबादहून औसाकडे जात असतांना सदर वाहनाची तपासणी केली असता 1 लाख 17 हजार 630 रुपये निदर्शनास आले. तसेच याच दिवशी वाहना क्र. एम एच 13 बी एन 9355 ही कुर्डूवाडी ते पंरडाकडे येत असतांना पथकानने सदर वाहनाची तपासणी केली असता मुनवर छोटूभाई बागवान व अक्षय सुरेश कारंडे यांचेकडे असलेल्या 2 बॅगेत 66 लाख रुपयांची रक्कम मिळाली. तर 15 ऑक्टोंबर रात्री स्थिर पथकाने खंडाळा येथे अप्पासाहेब नाना बिराजदार रा. तुळजापूर यांचे वाहन क्र. एम एच 25 आर 6698 या वाहनाची तपासणी केली असता 4 लाख 1 हजार रुपयांची रक्कम प्राप्त झाली. यावेळी पथकाने संबंधीताना सदर रक्कमेबाबत चौकशी केली असता, त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे ही रक्कम जमा करुन संबंधीत मतदार संघातील कोषागार कार्यालयात जमा करण्यात आली आहे.
तसेच अवैध मद्य बाबतीत विविध ठिकाणी कारवाई करुन एकुण 113 गुन्हे दाखल करत 12 लाख 94 हजार रुपये किमंतीचे 1 हजार 260 लिटर अवैध मद्य आतापर्यंत जप्त करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविली आहे.
****


Saturday, 12 October 2019

242-उस्मनाबाद मतदार संघ : उमेदवारांनी केला पहिल्या टप्प्यातील खर्च सादर


वि.स. वृत्त : 49                                                       दिनांक : 11 ऑक्टोंबर, 2019

240-उमरगा मतदार संघ : उमेदवारांनी केला पहिल्या टप्प्यातील खर्च सादर
उस्मानाबाद,दि.11: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रत्येक उमेदवाराला अठ्ठावीस लाख रुपये खर्चाची मर्यादा आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रचारासाठी झालेला खर्च तीन टप्प्यांत निवडणूक निरीक्षकांकडे सादर करण्याचे उमेदवारांनी बंधन आहे. त्यानुसार 240-उमरगा विधानसभा मतदार संघातील 11 उमेदवारांनी दि. 7 ऑक्टोंबर पर्यंत झालेल्या निवडणूक खर्चाचा लेखा-जोखा निवडणूक निरिक्षक (खर्च) ब्रिजेश कुमार पांडे यांच्याकडे सादर केला असून त्याचा तपशील पुढील प्रमाण आहे.
बहुजन समाज पार्टी पक्षाचे उमेदवार गायकवाड तानाजी वैजीनाथ यांचा दि. 7 ऑक्टोंबर 2019 रोजी पर्यंत रु.5000/-एवढा खर्च झाला आहे. तर शिवसेना पक्षाचे उमेदवार चौगुले  ज्ञानराज  धोडीराम यांचा रु.58,212/-, मनसे पक्षाचे उमेदवार जालीधर श्रवण कोकणे यांचा 26,730/-, कॉग्रेस पक्षाचे उमेदवार दत्तु रोहिदास भालेराव  यांचा रु. 66,601/-, वंचित बहुजन आघाडी पक्षाचे उमेदवार रमाकांत लक्ष्मण गायकवाड यांचा रु. 29,065/-, बळीराजा पार्टी पक्षाचे उमेदवार सचिन जयहिंद देडे यांचा रु. 5,600/-, बहुजन विकास आघाडी पक्षाचे उमेदवार संदीप धर्मा कटाबु यांचा रु.6,220/-, अपक्ष उमेदवार अमोल मोहण कवठेकर यांचा रु. 9,035/-, अपक्ष उमेदवार दिलीप नागनाथ गायकवाड यांचे 8,270/- , अपक्ष उमेदवार रावसाहेब श्रीरंग सरवदे यांचा रु.7,042/- आणि अपक्ष पक्षाचे उमेदवार सुर्यकांत रतन चौगुले यांनी रु. 17,950/- एवढा खर्च सादर केला आहे.
                                                   ****

वि.स. वृत्त : 50                                                       दिनांक : 11 ऑक्टोंबर, 2019

241-तुळजापुर मतदार संघ : उमेदवारांनी केला पहिल्या टप्प्यातील खर्च सादर
उस्मानाबाद,दि.11: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रत्येक उमेदवाराला अठ्ठावीस लाख रुपये खर्चाची मर्यादा आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रचारासाठी झालेला खर्च तीन टप्प्यांत निवडणूक निरीक्षकांकडे सादर करण्याचे उमेदवारांनी बंधन आहे. त्यानुसार 241-तुळजापुर विधानसभा मतदार संघातील 11 उमेदवारांनी दि. 8 ऑक्टोंबर पर्यंत झालेल्या निवडणूक खर्चाचा लेखा-जोखा निवडणूक निरिक्षक (खर्च) ब्रिजेश कुमार पांडे यांच्याकडे सादर केला असून त्याचा तपशील पुढील प्रमाण आहे.
भारतीय राष्‍ट्रीय कॉग्रेस पक्षाचे उमेदवार मधुकरराव देवराव चव्हाण यांचा रु. 2,52,065/-एवढा  खर्च झाला आहे. तर महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे उमेदवार  प्रशांत प्रकाश नवगिरे यांचा रु. 39,659/-, बहुजन समाज पार्टी पक्षाचे उमेदवारॲड. शैलेद्र रामेश्‍वरअप्‍पा यावलकर यांचा रु.10,520/-, भारतीय जनता पार्टी पक्षाचे उमेदवार राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील यांचा रु.1,30,608/-, अखिल भारतीय एकता पार्टी पक्षाचे उमेदवार अनिल नेताजी जाधवर यांचा रु.12,950/-, वंचित बहुजन आघाडी पक्षाचे उमेदवार अशोक हरीदास जगदाळे यांचा 3,07,305/-, बळीराजा पार्टी पक्षाचे उमेदवार तात्या पंढरीनाथ रोडे यांचा रु.15,300/-, टिपू सुलतान पार्टी पक्षाचे उमेदवार तौफीक अब्बास पटेल यांचा रु.11,150/-, प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार महेंद्र भानुदास धुरगुडे यांचा रु.26,358/-, अपक्ष उमेदवार अतिष अशोक रसाळ यांचे रु.6,100/- अपक्ष उमेदवार तन्वीर अली सय्यद अली खतीब यांचे रु.10,865/-, अपक्ष दत्ता सुदाम कांबळे यांचा रु.6,090/- अपक्ष उमेदवार नवनाथ दशरथ उपळेकर यांचा रु.5,600/- अपक्ष उमेदवार पांडुरंग ज्ञानोबा शिंदे याचा रु.11,380/-, अपक्ष उमेदवार मधुकर देवराव चव्हाण यांचा रु.13,430/-, अपक्ष महानंदा राजेंद्र दुधभाते यांचा रु.15,490/-, अपक्ष उमेदवार विशाल भाऊसाहेब जानराव यांचा रु.6,500/- आणि अपक्ष उमेदवार शेख बाबा फैजुद्दिन यांनी रु.15,611/-  एवढा खर्च सादर केला आहे.

वि.स. वृत्त : 51                                                       दिनांक : 11 ऑक्टोंबर, 2019

242-उस्मनाबाद मतदार संघ : उमेदवारांनी केला पहिल्या टप्प्यातील खर्च सादर
उस्मानाबाद,दि.11: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रत्येक उमेदवाराला अठ्ठावीस लाख रुपये खर्चाची मर्यादा आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रचारासाठी झालेला खर्च तीन टप्प्यांत निवडणूक निरीक्षकांकडे सादर करण्याचे उमेदवारांनी बंधन आहे. त्यानुसार 242-उस्मानाबाद विधानसभा मतदार संघातील 11 उमेदवारांनी दि. 8 ऑक्टोंबर पर्यंत झालेल्या निवडणूक खर्चाचा लेखा-जोखा निवडणूक निरिक्षक (खर्च) अभय चरण रौत यांच्याकडे सादर केला असून त्याचा तपशील पुढील प्रमाण आहे.
 शिवसेना पक्षाचे उमेदवार कैलास बाळासाहेब घाडगे पाटील यांचा दि.8 ऑक्टोंबर, 2019 रोजी पर्यंत रु. 75,535/- एवढा खर्च झाला आहे. तर बहुजन समाज पार्टीचे उमेदवार भिका सुदामराव विद्यागर यांचा 7,750/-, नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टीचे उमेदवार संजय प्रकाश निंबाळकर यांचा 55,776/-, आम आदमी पार्टीचे उमेदवार ॲड. अजित (अण्णा) विश्वनाथ खोत पाटील यांचा 25,775/-,वंचित बहुजन आघाडी पक्षाचे उमेदवार धनंजय गंगाधर शिंगाडे यांचा 70,247/-, आखिल भारतीय एकता पार्टी पक्षाचे उमेदवार रघुनाथ मरीबा करबे रु.7,351/- टिपु सुलतान पार्टी पक्षाचे उमेदवार सिराज उर्फ पापा  फतरु सय्यद यांचा 10,458/-, संभाजी ब्रिगेड पार्टीचे उमेदवार डॉ. संदीप माणिकराव तांबारे यांचा 2,17,521/-, अपक्ष उमेदवार अजित बप्पासाहेब पिंगळे यांचा 10,300/-, अपक्ष उमेदवार  दत्ता मोहन तुप्पे यांचा 10,600/- आणि अपक्ष उमेदवार  सुरेश साहेबराव पाटील यांनी 76530/- एवढा खर्च सादर केला आहे.
****
वि.स. वृत्त : 52      

उमेदवारांना 28 लाख खर्चाची मर्यादा - खर्च निरिक्षक अभय चरण रौत

·         उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधिंना सूचना, नियमांचे पालन करावे.
·         दहा हजारांवरील खर्च धनादेशाद्वारे करणे बंधनकारक
·          
उस्मानाबाद, दि.11: विधानसभा निवडणूक लढविणा-या कोणत्याही उमेदवारांना या निवडणूक प्रचारासाठी 28 लाख रुपये खर्च करता येणार आहे.  प्रत्येक उमेदवाराने दहा हजारावरील खर्च धनादेशाद्वारे करावा, असे निर्देश ‍243, परंडा मतदार संघाचे केंद्रीय खर्च निरीक्षक अभय चरण रौत यांनी दिले आहेत.  भुम तहसिल कार्यालयातील सभागृहात उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. 
खर्च निरिक्षक अभय चरण रौत म्हणाले या मतदार संघातील उमेदवारांच्या खर्चाचे निरिक्षण प्रथम टप्यात दिनांक 11/10/2019, व्दितीय टप्पा दिनांक 15/10/2019 आणि तृतीय टप्पा दिनांक 19/10/2019 रोजी  सकाळी 10.30 ते 1.30 या वेळेत करण्यात येणार आहे.  उमेदवारांनी भारत निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या विहीत खर्चाच्या मर्यादेचे काटेकोरपणे पालन करावे.  खर्च नोंदवही, बँक पासबुक, खर्च प्रमाणके (व्हाऊचर्स) इत्यादी बाबत माहिती सतत अद्ययावत ठेवावी.  याबाबत काही अडचणी किंवा समस्या असल्यास निवडणूक निर्णय अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.  उमेदवारांनी या निवडणूकीसाठी सुरु केलेल्या बँक खात्यातून व्यवहार करावेत.  तसेच खरेदी केलेल्या प्रत्येक वस्तुचे बिल ही सादर करावे.  निवडणूक आयोगाच्या सूचनांचे सतत पालन करावे. भारत निवडणूक आयोगाने तक्रारीसाठी सी-व्हीजील ॲप सर्व नागरिकांना उपलब्ध करुन दिलेले आहे.  याशिवाय (02478) 273026 व 273027 या दुरध्वनी क्रमांकावरही तक्रार करता येऊ शकते, असेही ते म्हणाले. उमेदवारांनी दैनंदिन खर्चाच्या नोंदी ठेवाव्यात.  वेळोवेळी खर्चाची माहिती सादर करावी.  सहायक खर्च निरिक्षकांनी शॅडो रजिष्टर अदययावत ठेवावे असेही ते म्हणाले. 
दैनंदिन अहवाल सादर करावेत -  निवडणूकीसाठी उमेदवार निश्चीत झाले असून संबंधित विभागांनी आपले दैनंदिन अहवाल सादर करावेत असे निर्देश ‍243, परंडा मतदार संघाचे केंद्रीय खर्च निरीक्षक अभय चरण रौत यांनी दिले आहेत.  तहसील कार्यालयातील सभागृहात नोडल अधिका-यांची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते.  खर्च निरीक्षक अभय चरण रौत पुढे म्हणाले उमेदवारांची सभा, रॅली, रोड  शोचे पथकांनी परीपूर्ण चित्रीकरण करावे.  भरारी  पथकांनी निवडणूक कालावधीत सतत सतर्क राहावे.  बँकानी संशयीत व्यवहारांची माहिती दररोज सादर करावी असेही त्यांनी सांगितले व उपस्थित नोडल अधिकारी यांना मार्गदर्शन केले. 
यावेळी या मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा राशीनकर, सहा.निवडणूक निर्णयक अधिकारी उषाकिरण शृंगारे, जिल्हा कोषागार अधिकारी किरण कोटकर, खर्च निरिक्षक संपर्क अधिकारी अनंत कुंभार व गुनाळे, उमेदवार, त्यांचे प्रतिनीधी तसेच खर्च कक्षातील नोडल अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. 
                                                                          ****