Saturday, 13 May 2017
आरसोली येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पाहणी
उस्मनाबाद,दि.13:-
भूम तालक्यातील आरसोली या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री
ग्रामसडक योजनेच्या रस्त्याची पाहणी केली. भूम येथील आरसोली येथे आरसोली देवळाली,
तांबेवाडी या रस्त्याचे फीत कापून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदघाटन केले.
यावेळी
राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री तथा उस्मानाबादचे सहपालकमंत्री
महादेव जानकर,सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख, कामगार, भूकंप
पुनर्वसन, कौशल्य विकास व माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, विभागीय आयुक्त
पुरूषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी राधाकृष्ण
गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हा
अधीक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे तसेच महसूल व इतर विभागांचे प्रमुख
अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी आरसोली गावचे सरपंच आणि
गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेततळ्यांचा लाभ घ्यावा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उस्मनाबाद,दि.13:-
'मागेल त्याला शेततळे' ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. बालाजी चौधरी
या शेतकऱ्याने शासनाच्या 'मागेल त्याला शेततळे' या योजनेचा लाभ घेऊन शेतीत केलेल्या प्रगतीची इतर शेतकऱ्यांनी
प्रेरणा घेऊन 'मागेल त्याला
शेततळे' या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पार्डी (जि.
उस्मानाबाद) येथे मा. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते राष्ट्रीय कृषी विकास
योजनेअंतर्गत शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण कामाचा धनादेश लाभार्थी शेतकरी श्री.
बालाजी चौधरी यांना प्रदान करण्यात आला, यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. धनादेश
वाटपानंतर मा. मुख्यमंत्री महोदयांनी शेततळ्याची पाहणी केली.
यावेळी सहकार
मंत्री सुभाष देशमुख, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यविकास मंत्री तथा
उस्मानाबाद जिल्हयाचे सहपालकमंत्री महादेव जानकर, कौशल्य विकास व कामगार मंत्री संभाजी पाटील
निलंगेकर,आमदार सुजितसिंग ठाकूर, खासदार रवींद्र गायकवाड, विभागीय आयुक्त
पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी आर.व्ही.गमे आदी उपस्थित होते.
'मागेल त्याला
शेततळे' योजनेअंतर्गत वाशी तालुक्यामध्ये 273 शेततळ्यांचा लक्षांक असून 338 ऑनलाईन
अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी 325 अर्जाना
प्रशासकीय मंजूरी मिळाली असून 145 शेततळ्याचे काम पूर्ण झाले आहे. 165 शेततळ्याचे
काम सुरू आहे.
Subscribe to:
Posts (Atom)