Tuesday, 19 July 2022
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कर्ज योजनेतर्गत अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कर्ज योजनेतर्गत
अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू
उस्मानाबाद,दि.19(जिमाका) महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागांतर्गत असलेल्या येथील मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत अल्पसंख्याक समुदायातील अर्थात मुस्लिम,ख्रिचन,बौध्द,जैन,पारसी,शिख,ज्यू धर्मीय विद्यार्थीच्या उच्च शिक्षणाकरिता प्रामुख्याने मेडिकल,इंजिनिअरिंग,एमबीए, फार्मसी आदी अभ्यासक्रमांसाठी 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरिता कर्ज योजनेत अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे, पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करावावेत , असे आवाहन महामंडळाच्या व्यवस्थापकांनी केले आहे.
या योजनेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिक माहिती करीता www.malms.maharashtar.gov.in या संकेत स्थळाचा वापर करावा अथवा महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा . जिल्हा कार्यालयाचा पत्ता- मातोश्री क्लिनिक बिल्डिंग(डॉ.गपाट), पहिला मजला,पोलीस लाईन समोर मेन रोड,उस्मानाबाद. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन प्र.जिल्हा व्यवस्थापक रिजवान पठाण यांनी केले अहे.
****
जि.प.च्या महिला व बालविकास विभागाअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
जि.प.च्या महिला व बालविकास विभागाअंतर्गत
वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
उस्मानाबाद,दि.19(जिमाका) जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत अनुसुचित जातीच्या विशेष घटक योजनेत वयक्तिक लाभाच्या विविध योजनीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत, इच्छुकांनी अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे . यात अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांना सिंगल फेजवर चालणारी पिठाची गिरणीचा पुरवठा करण्यात येणार आहे . यात पात्र लाभार्थ्याना 90 टक्के प्रमाणे अनुदान मंजुर करण्यात येईल . अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांना शिलाई कम पिको-फॉल मशिनचा पुरवठा करण्यात येणार असून . पात्र लाभार्थ्याना 90 टक्के प्रमाणे अनुदान मंजुर करण्यात येणार आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांना सिंगल फेजवर चालणारी मिनी दाल मील पुरवठा करण्यात येणार असून पात्र लाभार्थ्याना 90 टक्के प्रमाणे अनुदान मंजुर करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद स्वंसपादीत उत्पन्नातील योजनेअंतर्गत सर्वसाधारण मुलीं, महिलांना एम.एस.सी.आय.टी.(MSCIT) प्रशिक्षण देण्यात येणार असून पात्र लाभार्थ्याना 90 टक्के प्रमाणे अनुदान मंजुर करण्यात येणार आहे.पाचवी ते बारावीपर्यत शिक्षण घेत असलेल्या सर्वसाधारण संवर्गातील मुलींना सायकल देण्यात येणार आहेत .यात पात्र लाभार्थ्याना 90 टक्के प्रमाणे अनुदान मंजुर करण्यात येईल.
या योजनांसाठी पात्र असलेल्या लाभार्थीनी विहित नमुन्यातील अर्ज तालुकास्तरावरील बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रा.) आणि गावपातळीवर अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्याशी संपर्क साधून दि. 17 ऑगस्ट 2022 पर्यत बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रा.) एकात्मिक बाल विकास सेवा योजना या कार्यालयास अर्ज सादर करण्याबाबत जिल्हा कार्यक्रम अधिकारी (मबावि) बी.एच. निपाणीकर यांनी कळविले आहे.
****
Subscribe to:
Posts (Atom)
