Saturday, 17 October 2020

अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे- राज्यमंत्री संजय बनसोडे

 




उस्मानाबाद, दि.17(जिमाका):- मागील तीन-चार दिवसात उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वदूर अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे तरी शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये धीर धरावा राज्य शासन अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पूर्णपणे पाठीशी असून शासनस्तरावरुन आवश्यक ती मदत देण्यात येईल असे ग्वाही सार्वजनिक बांधकाम, भूकंप पुनर्वसन, पर्यावरण, रोजगार हमी योजना, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.

        उस्मानाबाद तालुक्यातील करजखेडा येथील अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीची पाहणी राज्यमंत्री बनसोडे करत होते.त्या प्रसंगी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. 

यावेळी तहसीलदार गणेश माळी जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी उमेश घाटगे, गट विकास अधिकारी श्रीमती दिवाने,  भागवत भंडारकर , जगदीश पाटील, जिवन चव्हाण, नंदकुमार क्षीरसागर,शरद चव्हाण, यांच्यासह सर्व संबंधित तालुकास्तरीय अधिकारी कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.

  राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी उस्मानाबाद तालुक्यातील करजखेडा येथील शेतकरी गौतम सदाशिव चव्हाण यांच्या शेतीची व अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी प्रत्यक्ष शेतावर जाऊन केली. शेतकरी चव्हाण यांच्या शेताचे नाल्याच्या प्रवाहामुळे शेती मधील जमिनीचा थर वाहून गेल्याचे दिसून आले तसेच ठिबक सिंचन सेट तसेच टोमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले. त्या अनुषंगाने उस्मानाबाद तालुक्यात झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत असे निर्देश यावेळी त्यांनी दिले.

    अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे पंचनामे करून या शेतकऱ्यांना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही राज्यमंत्री बनसोडे यांनी दिली.

घटस्थापनेने श्री तुळजाभवानी देवीजींचा नवरात्र महोत्सवास प्रारंभ

शारदीय नवरात्र महोत्सव-2020 
उस्मानाबाद, दि.17(जिमाका): महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास तुळजापूर येथे शनिवारी धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. श्री तुळजाभवानी मंदिरात पहाटे पारंपारीक पध्दतीने श्री तुळजाभवानी देवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर दुपारी 12 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्री कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते आज विधिवत घटस्थापना करण्यात आली. मंत्रोच्चाराने, आई राजा उदो-उदोचा जयघोष आणि संबळाच्या साथीने सर्व पुजाविधी करण्यात आले. यावेळी मंदिरातील पहिल्या दिवसाच्या मुख्य पुजेचा मान यशराज मुकूंद कदम यांना मिळाला. त्यांनी मंदिरात विधिवत पूजन केले. त्यानंतर घटकलशाची पारंपरिक पध्दतीने पुजा करुन गोमुख तिर्थापासून या घटकलशांची मिरवणूक काढण्यात आली. मंदिरातील गाभाऱ्यात तसेच खंडोबा मंदिर, यमाईदेवी मंदिर, टोळभैरव आणि आदिमाया आदिशक्ति या मंदिरामध्ये जिल्हाधिकारी श्री कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते सपत्नीक घटस्थापना करण्यात आली. मंदिर व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने भाविकांच्या दर्शनाच्या सोयीसाठी मंदिर संस्थानचे अधिकृत संकेत स्थळावर(www.shrituljabhavani.org) ऑनलाईन दर्शन व्यवस्था करण्यात आली असून भाविकांनी दर्शन सुविधेचा लाभ घरी बसुनच घ्यावा असे आवाहन करुन सर्व भाविकांना शारदीय नवरात्र महोत्सवाच्या शुभेच्छा यावेळी दिल्या. यावेळी मंदिरातील धार्मिक कार्यक्रमास जिल्हाधिकारी श्री कौस्तुभ दिवेगावकर यांच्यासह अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले उपविभागीय अधिकारी श्री सचिन गिरी, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, महंत तुकोजी बुवा, महंत हमरोजी बुवा, महंत चिलोजी बुवा पाळीकर पुजारी मंडळ, उपाध्ये मंडळ, भोपे पुजारी मंडळाचे पदाधिकारी, श्री अमर कदम, श्री सज्जन साळुंके, श्री अनंत कोंडो तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) श्री सौदागर तांदळे मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक सिध्देश्वर इन्तुले, जयसिंग पाटील, नागेश शितोळे आदी उपस्थित होते. याशिवाय भोपे, पुजारी, आराधी, गौंधळी उपस्थित होते.

Friday, 26 June 2020

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गरज भासल्यास खाजगी डॉक्टारांना शासकीय सेवेसाठी सक्तीने घ्यावे -वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

वृत्त क्र. 404                                                                                               दि. 26 जून, 2020

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गरज भासल्यास खाजगी
डॉक्टारांना शासकीय सेवेसाठी सक्तीने घ्यावे
                                      -वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

उस्मानाबाद,दि.26(जिमाका):- कोवीड-19 चा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा सर्वतोरीने प्रयत्न करीत आहे.मात्र रुग्णांची संख्या वाढत असून या रुग्णांना आरोग्य सेवा देण्यास आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडत असल्याने ती भरती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांना विशेष अधिकार दिले असून त्यांनी खाजगी प्रॅक्टीस करणाऱ्या डॉक्टरांना कोवीड -19 च्या अनुषंगाने  रुग्णांच्या सेवेसाठी शासकीय रुग्णालयात घ्यावे, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतीक कार्य
मंत्री अमित देशमुख  यांनी दिले.
      जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय कोवीड-19 आढावा बैठकीचे आयोजन ना.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर,आमदार कैलास घाडगे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन,निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राज गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्ही.वडगावे, शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.प्रकाश खापर्डे, तहसिलदार गणेश माळी,न.प.उस्मानाबादचे मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे  आदी उपस्थित होते.
       वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख पुढे म्हणाले की, उस्मानाबाद येथे कोरोना विषाणूची तपासणी करण्यासाठी लॅब मध्ये मशीन लवकरच बसविण्यात येणार असून ती येण्यापूर्वी संबंधित तज्ञांना प्रशिक्षणासाठी लातूर किंवा सोलापूर येथे पाठविल्यास मशीन बसविल्यानंतर तपासणी करण्यास वेळ वाया जाणार नाही.तसेच हे मशीन बसविण्यासाठी डॉ.लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली मायक्रो बायोलॉजिकल तज्ञाची नियुक्ती करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
      जिल्ह्यातील सर्व खाजगी रुग्णालये सुरू आहेत की नाही याबाबत खात्री करावी व त्या रुग्णालयातून आवश्यक आरोग्यसेवा रुग्णांना उपलब्ध झाल्या पाहिजेत. तसेच उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लवकर सुरू होण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबीची पूर्तता प्रशासनाने तात्काळ करावी अशा सूचनाही श्री. देशमुख यांनी दिल्या. 
      कोरोना च्या अनुषंगाने आरोग्य विभागाकडे औषधीचा पुरेसा साठा असणे गरजेचे आहे. त्यानुसार आरोग्य विभागाने औषधीचा मुबलक साठा करून ठेवावा. जिल्ह्यात संस्थात्मक विलगीकरण व होम कोरंटाईन ची परिस्थिती कशी आहे याची माहिती घेऊन संस्थात्मक विलगीकरण कक्षातील व्यक्तींना आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात व त्यांची नियमित तपासणी करावी.तसेच होम कोरानटाईन केलेल्या व्यक्तींशी ही आशा वर्कर अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून संपर्कात राहावे, असे निर्देश श्री देशमुख यांनी दिले.
    यावेळी जि.प.अध्यक्षा अस्मिता कांबळे व खासदार ओमराजे निंबाळकर यांनी देखील जिल्हयातील आरोग्य यंत्रणेसाठी आवश्यक असणाऱ्या बाबी मंत्री महोदयाच्या निर्देशनास आणुन दिल्या. 
      प्रारंभी जिल्हाधिकारी मुधोळ-मुंडे यांनी कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाने पहिल्या लॉक डाऊन पासून ते आज पर्यंत करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राज गलांडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्ही वडगावे यांनी कोरोना बाबत जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून प्रत्येक गावस्तरावर करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
*********