Saturday, 21 December 2019
Friday, 15 November 2019
जिल्हयातील सर्व शाळा महाविद्यालयांनी केले लोकराज्यचे सामूहिक वाचन जवळपास 1हजार885शाळा-महाविद्यालये,10हजार शिक्षक,3लाख विद्यार्थ्यांचा सहभाग तर दोन शाळा झाल्या “लोकराज्यशाळा”
वृत्त क्र:- 706 दि.14 नोव्हेंबर 2019
स्वच्छता अभियानाची जनजागृती करण्यासाठी
पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या
फिरत्या वाहनाचे उदघाटन संपन्न
उस्मानाबाद,दि.14(जिमाका) :- जिल्हा परिषद
उस्मानाबाद अंतर्गत आठ तालुक्यातील 150 ग्रामपंचायतमध्ये स्वच्छता अभियानाची
जनजागृती करण्यासाठी, महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने
देण्यात आलेल्या "एलईडी शो प्रदर्शित करणाऱ्या वाहनाचे" जिल्हा परिषद,
उस्मानाबादचे अध्यक्ष श्री नेताजी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांच्या
हस्ते हिरवी झेंडी दाखवून आणि अति. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अनुप शेंगुलवार,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व
स्वच्छता) श्री.अनंत कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे यांच्या
प्रमुख उपस्थितीत उदघाटन करण्यात आले.
****
वृत्त
क्र:- 707
जिल्हयातील
सर्व शाळा महाविद्यालयांनी केले
लोकराज्यचे
सामूहिक वाचन
जवळपास
1हजार885शाळा-महाविद्यालये,10हजार शिक्षक,3लाख विद्यार्थ्यांचा सहभाग तर दोन शाळा
झाल्या “लोकराज्यशाळा”
उस्मानाबाद,दि.14(जिमाका):- "एकाच दिवशी एकाच वेळी" ही
संकल्पना केंद्रस्थानी ठेवून उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व शाळा व
महाविद्यालयांमध्ये दिनांक 14 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 10:30 ते 11:00 या वेळेत शासनाचे
मुखपत्र लोकराज्य मासिकातील पंडित नेहरू यांच्यावरील लेखाचे सामूहिक वाचन हा
उपक्रम उपक्रम राबविण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यास सकारात्मक प्रतिसाद
देत जिल्हयातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये लोकराज्यचे सामूहिक वाचन संपन्न
झाले. जवळपास 1 हजार 885 शाळा-महाविद्यालयातील जवळपास 10 हजार शिक्षक आणि 3
लाख विद्यार्थ्यांनी लोकराज्य मासिकांचे
सामूहिक वाचन केले.गुगल फॉर्मच्या माध्यमातून संकलित होणारी अधिकृत आकडेवारी लवकरच
जाहीर करण्यात येईल.
मागील वर्षीही
दि.1 सप्टेंबर 2018 रोजी हा उपक्रम राबविण्यात आला होता.त्यावेळी एकूण 1 लाख 26
हजार 229 शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मिळून लोकराज्य मासिकाचे
एकाच दिवशी एकाच वेळी सामूहिक वाचन केले होते.
या उपक्रमाचा
मुख्य कार्यक्रम आज दि. 14
नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा ते अकरा या वेळेत भोसले हायस्कूल उस्मानाबाद येथे संपन्न
झाला. यावेळी या कार्यक्रमासाठी औरंगाबाद विभागाचे माहिती व जनसंपर्क विभागाचे
संचालक गणेश रामदासी, लातूर विभागाचे माहिती व जनसंपर्क चे उपसंचालक यशवंत भंडारे,
शिक्षणाधिकारी सविता भोसले, उपशिक्षणाधिकारी सौ.
रोहिणी कुंभार, माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक दिनकर होळकर, आदर्श शिक्षण
प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी श्री. आदित्य पाटील, उपप्रशासकीय अधिकारी संतोष
घार्गे, उपमुख्याध्यापक श्री सिद्धेश्वर कोळी, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक दत्तात्रय
थेटे, विस्ताराधिकारी श्री. संतोष माळी, विस्ताराधिकारी बालाजी यरमुनवाड , विशेष सहाय्यक तानाजी खंडागळे, अण्णा ई टेक्नो चे प्राचार्य आर .बी .जाधव,
पर्यवेक्षक हाजगुडे एन .एन., इंगळे वाय .के., श्रीमती गुंड, के . पी .पाटील आणि तीन
हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नागरिक यांची प्रमुख
उपस्थिती लाभली.
****
श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्ये बालदिनानिमित्त लोकराज्य मासिकाचे सामूहिक वाचन उत्साहात
वृत्त क्र:- 704 दि.14 नोव्हेंबर 2019
अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांनी
विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा
उस्मानाबाद,दि.14(जिमाका)
:- महिला व बाल व
बाल विकास विभाग, जिल्हा परिषद उस्मानाबाद या विभागांतर्गत सन 2019-20 जिल्हा
वार्षिक योजना (अजाघका) अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांना सिंगल फेजवर
चालणारी पिठाची गिरणी, जिल्हा वार्षिक योजना (अजाघका)अंतर्गत अनुसूचित जाती
प्रवर्गातील महिलांना शिलाई कम पिको-फॉल मशिन. जिल्हा परिषद सेस योजनेंतर्गत
सर्वसाधारण मुली,महिलांना एम.एस.सी.आय.टी./सी.सी.सी./समकक्ष प्रशिक्षण देणे,या
योजनांचे अर्ज प्रत्येक तालुक्याच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण) प्रकल्प
कार्यालयाशी संपर्क साधून सादर करावेत,असे आवाहन जिल्हा कार्यक्रम अधिकारी (मबावि)
श्री.बी.एच.निपाणीकर यांनी केले आहे.
****
वृत्त क्रमांक-705
श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्ये बालदिनानिमित्त
लोकराज्य मासिकाचे सामूहिक वाचन
उत्साहात
उस्मानाबाद,दि.14(जिमाका) : येथील विद्यार्थी संख्येमध्ये सर्वात मोठ्या असणाऱ्या श्रीपतराव भोसले हायस्कूल
मध्ये माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून मोठ्या
उत्साहात साजरी करण्यात आली व 14 नोव्हेंबर 2017 रोजी प्रकाशित झालेल्या लोकराज्य
मासिकाचे सामूहिक वाचन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून माहिती व जनसंपर्क औरंगाबाद विभागाचे संचालक
श्री. गणेश रामदासी तर प्रमुख पाहुणे म्हणून लातूर विभागाचे उपसंचालक यशवंत भंडारे
उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पंडित
जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. लोकराज्य मासिकाच्या
वाचनाच्या उपक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी श्री. मनोज सानप यांनी
केले. लोकराज्य मासिकाचे वाचन प्रातिनिधिक स्वरूपात प्रशालेची विद्यार्थीनी कु.
अमृता पवार हिने केले.
औरंगाबाद विभागाचे माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक गणेश रामदासी यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांच्या कौतुकाबरोबरच लोकराज्य मासिकाची
माहिती दिली. प्रशालेचे
प्राचार्य श्री.पडवळ येथे त्यांनी 'माझी शाळा लोकराज्यशाळा ' या संकल्पाची
उद्घोषणा करून पालक, विद्यार्थी, शिक्षक सर्वांनीच लोकराज्य मासिक सभासद होण्याचा
संकल्प केला.
प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सौ. सविता भोसले यांनी आपल्या भाषणातून
कार्यक्रमाचा समारोप केला. याप्रसंगी उपशिक्षणाधिकारी सौ. रोहिणी कुंभार, माध्यमिक
शिक्षण विभागाचे अधीक्षक दिनकर होळकर, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय
अधिकारी श्री.
आदित्य पाटील, उपप्रशासकीय अधिकारी संतोष घार्गे, उपमुख्याध्यापक श्री
सिद्धेश्वर कोळी, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक दत्तात्रय थेटे, विस्ताराधिकारी
श्री. संतोष माळी, विस्ताराधिकारी यरमुनवाड बालाजी ,विशेष सहाय्यक तानाजी खंडागळे, अण्णा ई टेक्नो चे प्राचार्य आर .बी .जाधव सर पर्यवेक्षक हाजगुडे एन .एन.
इंगळे वाय .के. गुंड मॅडम सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन के .
पी .पाटील सर यांनी केले.
****
Subscribe to:
Posts (Atom)







