Friday, 15 November 2019

श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्ये बालदिनानिमित्त लोकराज्य मासिकाचे सामूहिक वाचन उत्साहात





 वृत्‍त क्र:- 704                                                   दि.14 नोव्हेंबर 2019

अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांनी
विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा
         उस्मानाबाद,दि.14(जिमाका) :- महिला व बाल व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद उस्मानाबाद या विभागांतर्गत सन 2019-20 जिल्हा वार्षिक योजना (अजाघका) अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांना सिंगल फेजवर चालणारी पिठाची गिरणी, जिल्हा वार्षिक योजना (अजाघका)अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांना शिलाई कम पिको-फॉल मशिन. जिल्हा परिषद सेस योजनेंतर्गत सर्वसाधारण मुली,महिलांना एम.एस.सी.आय.टी./सी.सी.सी./समकक्ष प्रशिक्षण देणे,या योजनांचे अर्ज प्रत्येक तालुक्याच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण) प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधून सादर करावेत,असे आवाहन जिल्हा कार्यक्रम अधिकारी (मबावि) श्री.बी.एच.निपाणीकर यांनी केले आहे.
                                            ****
वृत्त क्रमांक-705
श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्ये बालदिनानिमित्त
लोकराज्य मासिकाचे सामूहिक वाचन उत्साहात
उस्मानाबाद,दि.14(जिमाका) : येथील  विद्यार्थी संख्येमध्ये सर्वात मोठ्या असणाऱ्या श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्ये माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली व 14 नोव्हेंबर 2017 रोजी प्रकाशित झालेल्या लोकराज्य मासिकाचे सामूहिक वाचन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून माहिती व जनसंपर्क औरंगाबाद विभागाचे संचालक श्री. गणेश रामदासी तर प्रमुख पाहुणे म्हणून लातूर विभागाचे उपसंचालक यशवंत भंडारे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. लोकराज्य मासिकाच्या वाचनाच्या उपक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी श्री. मनोज सानप यांनी केले. लोकराज्य मासिकाचे वाचन प्रातिनिधिक स्वरूपात प्रशालेची विद्यार्थीनी कु. अमृता पवार हिने केले.
औरंगाबाद विभागाचे माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक गणेश रामदासी  यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांच्या कौतुकाबरोबरच लोकराज्य मासिकाची माहिती दिली. प्रशालेचे
प्राचार्य श्री.पडवळ येथे त्यांनी 'माझी शाळा लोकराज्यशाळा ' या संकल्पाची उद्घोषणा करून पालक, विद्यार्थी, शिक्षक सर्वांनीच लोकराज्य मासिक सभासद होण्याचा संकल्प केला.
प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सौ. सविता भोसले यांनी आपल्या भाषणातून कार्यक्रमाचा समारोप केला. याप्रसंगी उपशिक्षणाधिकारी सौ. रोहिणी कुंभार, माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक दिनकर होळकर, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी श्री.
आदित्य पाटील, उपप्रशासकीय अधिकारी संतोष घार्गे, उपमुख्याध्यापक श्री सिद्धेश्वर कोळी, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक दत्‍तात्रय थेटे, विस्ताराधिकारी श्री. संतोष माळी, विस्ताराधिकारी  यरमुनवाड  बालाजी ,विशेष सहाय्यक तानाजी खंडागळे,  अण्णा ई टेक्नो चे प्राचार्य आर .बी .जाधव सर पर्यवेक्षक हाजगुडे एन .एन. इंगळे वाय .के. गुंड मॅडम सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन के . पी .पाटील सर यांनी केले.
****

Sunday, 20 October 2019

जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे यांनी बजावला मतदानाचा हक्क


वि.स. वृत्त : 69                                                       दिनांक : 21 ऑक्टोंबर, 2019

जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे यांनी बजावला मतदानाचा हक्क

उस्मानाबाद,दि.21: विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीकरीता 242-उस्मानाबाद मतदार संघात आज सकाळी 7 वाजेपासून मतदानास सुरुवात झाली. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे यांनी उस्मानाबाद येथील (342) नगर पालिक शाळा क्र. 4 या मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.
****
वि.स. वृत्त :70                                                        दिनांक : 21 ऑक्टोंबर, 2019

जिल्ह्यात सखी मतदान केंद्रासह सक्षम आणि आदर्श मतदार केंद्राची स्थापना
उस्मानाबाद,दि.21: मतदाराचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढावा यासाठी लोकसभा निवडणूकीपासून निवडणूक आयोगामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार उस्मानाबाद जिल्ह्यात 8 सखी मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
जास्तीत जास्त मतदारांनी मतदानात सहभाग घ्यावा, मतदानाचे प्रमाण वाढवे यासाठी निवडणूक प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जातात. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही सखी मतदान केंद्राची स्थापाना करुन सदर केंद्राची आकर्षक सजावट करत हिरकणी कक्ष आदीची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.
याशिवाय ‍जिह्यात 4 आदर्श आणि 4 सक्षम मतदान केंद्राची  देखील स्थापना करण्यात आली असून  सदर मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावर मतदारांच्या स्वागतासाठी कमान, आकर्षक रांगोळी, सजावट, आकर्षक संदेशाचे फलकाद्वारे या मतदान केंद्राची सजावट करण्यात आलेली आहे. शहरासह जिल्ह्यात विविध मतदारसंघात अशी मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. या आकर्षक मतदान केंद्रावर करण्यात आलेली आकर्षक सजावट व स्वच्छतेमुळे मतदार उत्साहित दिसत होते. यावेळी मतदान केंद्रावर नव मतदार, ज्येष्ठ नागरिक आणि महिला मतदारांनी देखील उत्साहाने मतदान करत असल्याचे चित्र होते.
****









Thursday, 17 October 2019

स्थिर सर्वेक्षण पथकामार्फत आतापर्यंत 71 लाख रुपये जप्त


वि.स. वृत्त : 62                                                       दिनांक : 17 ऑक्टोंबर, 2019

स्थिर सर्वेक्षण पथकामार्फत आतापर्यंत 71 लाख रुपये जप्त
उस्मानाबाद,दि.17: विधानसभा निवडणूक आचारसंहिता जारी झाल्यानंतर स्थिर सर्वेक्षण पथकामार्फत चार ही विधानसभा मतदार संघात वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत स्थिर सर्वेक्षण पथकाने विविध ठिकाणी कारवाई करुन सुमारे 71 लाख रुपये जप्त केले आहेत.
यामध्ये 11 ऑक्टोंबर रोजी सांजा सुतगिरणी, सांजा रोड येथे महमंद शरीफ बागवान रा. ख्वाजा नगर, उस्मानाबाद हे त्यांच्या सहकाऱ्या सोबत वाहन क्र. एम एच 25 आर 6041 या वाहनातून उस्मानाबादहून औसाकडे जात असतांना सदर वाहनाची तपासणी केली असता 1 लाख 17 हजार 630 रुपये निदर्शनास आले. तसेच याच दिवशी वाहना क्र. एम एच 13 बी एन 9355 ही कुर्डूवाडी ते पंरडाकडे येत असतांना पथकानने सदर वाहनाची तपासणी केली असता मुनवर छोटूभाई बागवान व अक्षय सुरेश कारंडे यांचेकडे असलेल्या 2 बॅगेत 66 लाख रुपयांची रक्कम मिळाली. तर 15 ऑक्टोंबर रात्री स्थिर पथकाने खंडाळा येथे अप्पासाहेब नाना बिराजदार रा. तुळजापूर यांचे वाहन क्र. एम एच 25 आर 6698 या वाहनाची तपासणी केली असता 4 लाख 1 हजार रुपयांची रक्कम प्राप्त झाली. यावेळी पथकाने संबंधीताना सदर रक्कमेबाबत चौकशी केली असता, त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे ही रक्कम जमा करुन संबंधीत मतदार संघातील कोषागार कार्यालयात जमा करण्यात आली आहे.
तसेच अवैध मद्य बाबतीत विविध ठिकाणी कारवाई करुन एकुण 113 गुन्हे दाखल करत 12 लाख 94 हजार रुपये किमंतीचे 1 हजार 260 लिटर अवैध मद्य आतापर्यंत जप्त करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविली आहे.
****