Thursday, 19 September 2019

राज्यातील पहिली 'लोकराज्य' उर्दू शाळेचा बहुमान मिळालेल्या मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू शाळेचा पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देवून गौरव



वृत्त क्रमांक-635                                                                                                                                                        

राज्यातील पहिली 'लोकराज्य' उर्दू शाळेचा बहुमान मिळालेल्या
मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू शाळेचा
पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देवून गौरव

उस्मानाबाद,दि.17(जिमाका): मराठवाडा मुक्तीसंग्राम वर्धापनदिनानिमित्त आयोजित मुख्य सोहळयात मौलाना अबुल कलाम आझाद ही शाळा जिल्हयातील तसेच राज्यातील पहिली उर्दू लोकराज्य शाळा झाल्याबददल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक शिक्षण संस्थाचालक संघाचे जिल्हाध्यक्ष हाफीझ अलिमोद्दीन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देवून सन्मान करण्यात आला.
शासनाचे मुखपत्र 'लोकराज्य' हे लोकप्रिय मासिक देशातील सर्वाधिक खपाचे मासिक म्हणून मान्यता पावले आहे. राज्य शासनाच्या विविध योजना आणि निर्णय, त्यांची अंमलबजावणी यांची अधिकृत आणि अचूक माहिती पुरविणारे  व तब्बल 5 लाख 17 हजार 68 इतका अधिकृत खप असणारे हे एकमेव शासकीय मासिक आहे. समाजातील सर्वच घटकांना उपयुक्त असणारे हे मासिक आहे. विशेष म्हणजे हे मासिक मराठी भाषेसह इंग्रजी,उर्दू ,हिंदी आणि गुजराती  भाषेतही प्रकाशित होते.
जिल्हयात या मासिकाबाबत जिल्हा माहिती कार्यालयामार्फत विविध प्रकारे जनजागृती सातत्याने केली जाते.यास प्रतिसाद देताना जिल्हयातीलच नव्हे तर राज्यातील पहिली लोकराज्य अल्पसंख्याक संस्था होण्याचा बहुमान मौलाना अबुल कलाम आझाद शिक्षण संस्थेने मिळविला आहे. या संस्थेतील इ.7 वी ते 10 वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी उर्दू लोकराज्यचे  सभासदत्व स्वीकारले
 आहे. त्यामुळे ही शाळा आता जिल्हयातील तसेच राज्यातील पहिली उर्दू लोकराज्य शाळा म्हणून ओळखली जाणार आहे. मौलाना अबुल कलाम आझाद शिक्षण संस्था स्वच्छता अभियान, बेटी बचाव बेटी पढाओ मोहीम, मतदार जनजागृती, अल्पसंख्याक समाजात शिक्षणासाठी जनजागृती, पूरग्रस्तांसाठी मदत फेरी  असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यातही आघाडीवर आहे.
          या सन्मानाबददल या शाळेचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
********


Monday, 16 September 2019

राज्यातील पहिली 'लोकराज्य' उर्दू शाळा मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू शाळा


वृत्त क्रमांक-632                                               दि.16 सप्टेंबर 2019



राज्यातील पहिली 'लोकराज्य' उर्दू शाळा

मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू शाळा
                                                                  
          उस्मानाबाद,दि.16(जिमाका): शासनाचे मुखपत्र 'लोकराज्य' हे लोकप्रिय मासिक देशातील सर्वाधिक खपाचे मासिक म्हणून मान्यता पावले आहे. राज्य शासनाच्या विविध योजना आणि निर्णय, त्यांची अंमलबजावणी यांची अधिकृत आणि अचूक माहिती पुरविणारे  व तब्बल 5 लाख 17 हजार 68 इतका अधिकृत खप असणारे हे एकमेव शासकीय मासिक आहे.समाजातील सर्वच घटकांना उपयुक्त असणारे हे मासिक आहे. विशेष म्हणजे हे मासिक मराठी भाषेसह इंग्रजी,उर्दू ,हिंदी आणि गुजराती  भाषेतही प्रकाशित होते.
          जिल्हयात या मासिकाबाबत जिल्हा माहिती कार्यालयामार्फत विविध प्रकारे जनजागृती सातत्याने केली जाते. यास प्रतिसाद देताना जिल्हयातीलच नव्हे तर राज्यातील पहिली लोकराज्य अल्पसंख्याक संस्था होण्याचा बहुमान मौलाना अबुल कलाम आझाद शिक्षण संस्थेने मिळविला आहे. या संस्थेतील इ.7 वी ते 10 वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी उर्दू लोकराज्यचे  सभासदत्व स्वीकारले आहे. त्यामुळे ही शाळा आता जिल्हयातील तसेच राज्यातील पहिली उर्दू लोकराज्य शाळा म्हणून ओळखली जाणार आहे.
 मौलाना अबुल कलाम आझाद शिक्षण संस्था स्वच्छता अभियान, बेटी बचाव बेटी पढाओ मोहीम, मतदार जनजागृती, अल्पसंख्याक समाजात शिक्षणासाठी जनजागृती, पूरग्रस्तांसाठी मदत फेरी  असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यातही आघाडीवर आहे.
या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक शिक्षण संस्थाचालक संघाचे जिल्हाध्यक्ष हाफीझ अलिमोद्दीन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे जिल्हा माहिती कार्यालयातर्फे अभिनंदन करण्यात आले असून दि.17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम वर्धापनदिनानिमित्त आयोजित मुख्य सोहळयात पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देवून या संस्थेचा सन्मान करण्यात येणार आहे.
*******

Tuesday, 3 September 2019

फॉर्म नंबर 17 भरुन इ.10 वी ,इ.12 वी ची परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना नाव नोंदणी करण्यास मुदतवाढ

वृत्त क्र.603                                                                        दि.03 सप्टेंबर 2019
                                                                                             
फॉर्म नंबर 17 भरुन इ.10 वी ,इ.12 वी ची परिक्षा देणाऱ्या
विद्यार्थ्यांना नाव नोंदणी करण्यास मुदतवाढ
        उस्मानाबाद,दि.03,(जिमाका)  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इ. 12वी परीक्षा व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इ.10वी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या (फॉर्म नंबर 17) भरून परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रक्रियेद्वारे नाव नोंदणी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.
तरी इ.10वी च्या विद्यार्थ्यांनी http://form१७.mh-ssc.ac.in आणि इ.12 वी च्या विद्यार्थ्यांनी   http://form१७.mh-hsc.as.in या संकेतस्थळाला भेट दयावी व त्यावरील सूचनांनुसार आपली नाव नोंदणी करावी,असे आवाहन सचिव, राज्य मंडळ, पुणे यांनी केले आहे.
****
वृत्त क्र.604                                                        
जिल्हयातील विधानसभा मतदारसंघनिहाय
अंतिम मतदारयादी जाहीर
उस्मानाबाद,दि.03 (जिमाका):- दि.01 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदारयादयांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम राबविण्‍यात आला आहे. दि.01 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत अंतिम मतदार यादी दि. 31ऑगस्ट  रोजी  जिल्हयातील सर्व पदनिर्देशित ठिकाणी प्रसिध्द करण्यात आली आहे.
दि. 31 ऑगस्ट रोजी प्रसिध्द करण्यात आलेली विधानसभा मतदारसंघनिहाय अंतिम मतदारयादी पुढीलप्रमाणे-
240- उमरगा-पुरुष मतदार 1 लाख 57 हजार 480, महिला मतदार 1 लाख 39 हजार 266, इतर मतदार 1,   एकूण मतदार 2 लाख 96 हजार 747, 241- तुळजापूर-पुरुष मतदार 1 लाख 87 हजार 649, महिला मतदार 1 लाख 63 हजार 706, इतर मतदार 6, एकूण मतदार 3 लाख 51 हजार 361, 242- उस्‍मानाबाद- पुरुष मतदार 1 लाख 86 हजार 690, महिला मतदार 1 लाख 65 हजार 665, इतर मतदार 10, एकूण मतदार 3 लाख 52 हजार 365, 243- परंडा- पुरुष मतदार 1 लाख 67 हजार 026, महिला मतदार 1 लाख 46 हजार 740, इतर मतदार 1, एकूण मतदार 3 लाख 13 हजार 767 अशा प्रकारे जिल्हयात पुरुष मतदार 6 लाख 98 हजार


845 तर  महिला मतदार 6 लाख 15 हजार 377, इतर मतदार 18,  असे मिळून एकूण 13 लाख 14 हजार 240 मतदार आहेत.
दि. 31 ऑगस्ट 2019 रोजी प्रसिध्‍द करण्‍यात आलेल्‍या अंतिम मतदारयादीमध्‍ये लोकसभा
सार्वत्रि‍क निवडणूक 2019 च्‍या तुलनेत पुरुष मतदारसंख्‍या 8 हजार 668 व महिला मतदारांची संख्‍या 9 हजार 241 वाढली आहे.
जिल्‍हयामध्‍ये लोकसभा सार्वत्रि‍क निवडणूक 2019 च्‍या मतदारयादीच्या तुलनेत 18-91 वयोगटाच्‍या मतदारांमध्‍ये 23 हजार 358 वरुन 29 हजार 67  इतकी वाढ झाली आहे. तसेच
जिल्हयातील सैनिक मतदारांची संख्या 2 हजार 665 इतकी आहे.
आगामी विधानसभा निवडणूक – 2019 च्‍या अनुषंगाने अंतिम मतदारयादीमध्‍ये सर्व
नागरिकांनी आपल्‍या नावाची पडताळणी करावी. त्‍याकरीता नागरिक मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी यांचेकडील मतदार यादी, 1950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करुन चौकशी ,
www.nvsp.org.in/www.ceomaharashtra.gov.in या  वेबसाईटला भेट सुविधांचा वापर करु
शकतात.
तरी जिल्‍हयातील सर्व मतदारांनी मतदारयादीमधील आपल्‍या नावाची पडताळणी करुन घ्यावी आणि आगामी विधानसभा सार्वत्रि‍क निवडणुकीमध्‍ये होणाऱ्या मतदान प्रकियेमध्‍ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ-मुंडे व उपजिल्हाधिकारी (निवडणूक) डॉ.प्रताप काळे यांच्याकडून करण्यात आले आहे.
                                     ****