४०-उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील
दुस-या फेरीअखेरचा निकाल घोषित
उस्मानाबाद, दि. २३ - ४०-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांना दुस-या फेरीअखेर विधानसभा मतदारसंघनिहाय मिळालेली मते पुढीलप्रमाणे.
ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर {शिवसेना} यांना 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 5 हजार 959 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 4 हजार 181, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 550, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 405, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 824 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 482 मते असे एकूण 24 हजार 401 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे दुस-या फेरीअखेर ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर {शिवसेना} यांना मिळालेली एकूण मते 49 हजार 086 आहेत.
राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील {राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 1 हजार 848 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 4 हजार 250, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 4 हजार 280, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 013, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 921 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 458 मते असे एकूण 20 हजार 770 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे दुस-या फेरीअखेर राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील {राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 37 हजार 960 आहेत.
डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमन {बहुजन समाज पार्टी} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 70 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 54, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 34,242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 22, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 39 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 46 मते असे एकूण 265 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे दुस-या फेरीअखेर डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमन {बहुजन समाज पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 538 आहेत.
अर्जुन {दादा} सलगर {वंचित बहुजन आघाडी} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 1 हजार 105 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 662, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 894,242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 1 हजार 248 , 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 307 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 462 मते असे एकूण 4 हजार 678 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे दुस-या फेरीअखेर अर्जुन {दादा} सलगर {वंचित बहुजन आघाडी} यांना मिळालेली एकूण मते 9 हजार 104 आहेत.
अण्णासाहेब रामचंद्र राठोड {भारतीय बहुजन क्रांती दल} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 17 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 17, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 11,242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 07, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 07 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 08 मते असे एकूण 67 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे दुस-या फेरीअखेर अण्णासाहेब रामचंद्र राठोड {भारतीय बहुजन क्रांती दल} यांना मिळालेली एकूण मते 136 आहेत.
दिपक महादेव ताटे {भापसे पार्टी} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 16 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 11, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 12, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 23, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 10 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 10 मते असे एकूण 82 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे दुस-या फेरीअखेर दिपक महादेव ताटे {भापसे पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 147 आहेत.
फुलसूरे विश्वनाथ सदाशिव {क्रांतीकारी जयहिंद सेना} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 14 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 14, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 08,242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 08, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 09 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 05 मते असे एकूण 58 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे दुस-या फेरीअखेर फुलसूरे विश्वनाथ सदाशिव {क्रांतीकारी जयहिंद सेना} यांना मिळालेली एकूण मते 138 आहेत.
आर्यनराजे किसनराव शिंदे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 13 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 19, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 12, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 07, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 07 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 08 मते असे एकूण 66 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे दुस-या फेरीअखेर आर्यनराजे किसनराव शिंदे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 126 आहेत.
गोरे नेताजी नागनाथराव {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 92 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 76, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 41, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 31, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 54 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 48 मते असे एकूण 342 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे दुस-या फेरीअखेर गोरे नेताजी नागनाथराव {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 649 आहेत.
जगन्नाथ निवृत्ती मुंडे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 30 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 19, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 14, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 12, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 20 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 15 मते असे एकूण 110 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे दुस-या फेरीअखेर जगन्नाथ निवृत्ती मुंडे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 220 आहेत.
तुकाराम दासराव गंगावणे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 18 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 22, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 13, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 60, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 16 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 15 मते असे एकूण 91 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे दुस-या फेरीअखेर तुकाराम दासराव गंगावणे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 161 आहेत.
डॉ. वसंत रघुनाथ मुंडे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 20 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 20, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 10, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 04, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 21 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 15 मते असे एकूण 90 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे दुस-या फेरीअखेर डॉ. वसंत रघुनाथ मुंडे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 175 आहेत.
शंकर पांडुरंग गायकवाड {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 17 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 19, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 11, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 08, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 19 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 14 मते असे एकूण 88 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे दुस-या फेरीअखेर शंकर पांडुरंग गायकवाड {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 169 आहेत.
सय्यद सुलतान लाडखॉं {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 24 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 39, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 22, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 17, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 24 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 20 मते असे एकूण 146 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे दुस-या फेरीअखेर सय्यद सुलतान लाडखॉं {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 277 आहेत.
वरीलपैकी एकही नाही { NOTA } 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 79 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 91, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 73, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 49, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 78 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 43 मते असे एकूण 413 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे NOTA ला दुस-या फेरीअखेर एकूण मते 821 आहेत.
--------------*****-----------
|
|
Wednesday, 22 May 2019
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील दुस-या फेरीअखेरचा निकाल घोषित
Monday, 20 May 2019
पालक सचिव अनिल डिग्गीकर यांनी घेतला पाणी व चारा टंचाईचा सविस्तर आढावा
वृत्त
क्र.282 दि.18
मे 2019
पालक सचिव अनिल डिग्गीकर यांनी घेतला
पाणी व चारा टंचाईचा सविस्तर आढावा
उस्मानाबाद,दि.18 :- येथील
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात प्रधान सचिव पर्यावरण विभाग तथा जिल्ह्याचे
पालक सचिव अनिल डिग्गीकर यांच्या
अध्यक्षतेखाली जिल्हयातील पाणी टंचाई व चारा टंचाईबाबत आढावा बैठक घेण्यात आली.
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी
विविध उपाययोजना राबविण्यात येत असून त्याचा व्यापक आढावा आज झालेल्या या पाणी
टंचाई व चारा टंचाई आढावा बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत दुष्काळाची स्थिती आणि
त्याबाबतच्या उपाययोजनांवर विस्ताराने चर्चा करण्यात आली.
रोजगार हमी योजनेखाली कामांच्या
मागणीचे प्रस्ताव आल्यास तीन दिवसात संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून अशा
प्रस्तावांना मान्यता देण्यात येणार असून यासंदर्भात कुचराई करणाऱ्यांवर कारवाई
करण्यात येणार आहे. दुष्काळी भागातील शिधापत्रिका उपलब्ध नसलेल्या शेतकरी व
शेतमजूरांना शिधापत्रिकांचे तातडीने वितरण करण्यासह शेळ्या-मेंढ्यांसाठी प्रायोगिक
तत्त्वावर छावण्या सुरु करण्याचा निर्णयही आज झालेल्या आढावा बैठकीत घेण्यात आला.
उस्मानाबाद मध्ये
सध्या 140 गाव-वाड्यांमध्ये 177 टँकर्सने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यावर्षी
टँकर्सच्या संख्येत वाढ करण्याबाबतच्या मागणीसंदर्भात वर्ष 2018 च्या अंदाजित
लोकसंख्येचा विचार करून अद्ययावत नियोजन करण्यात आले आहे. टॅंकरसाठी एकूण १४२
गावातील १७१ विंधन विहिरी तर टॅंकरव्यतिरिक्तसाठी एकूण ३२७ गावांतील ६६० विंधन
विहिरी असे एकूण ४६९ गावातील ८३१ विंधन विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील
जनावरांना चारा व पाणी उपलब्ध होण्यासाठी 87 ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्यात
आल्या आहेत. या छावण्यांमध्ये 61 हजार 102 मोठी आणि 7 हजार 136 लहान अशी एकूण 68 हजार 238 जनावरे
आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (NDRF) निकषापेक्षाही जास्त दराने मदत
देण्यात येत असून या मदतीत 15 मे पासून पुन्हा वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार
मोठ्या जनावरांना 100 रुपये तर लहान जनावरांना 50 रुपये देण्यात येत आहेत.
यापूर्वी हेच अनुदान 90 आणि 45 रुपये याप्रमाणे होते. चारा छावणीत दाखल झालेल्या
जनावरांच्या उपस्थितीसाठी आठवड्यातून एकदा स्कॅनिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला
आहे.
जिल्हा पाणी
टंचाई व चारा टंचाई बाबतच्या या बैठकीस जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, मुख्य
कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, अप्पर
जिल्हाधिकारी पराग सोमण, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, तसेच जिल्हयातील
विविध यंत्रणांचे कार्यालयप्रमुख उपस्थित होते.
-----0-----
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज
वृत्त क्र.283 दि.20
मे 2019
लोकसभा
सार्वत्रिक निवडणूक 2019
जिल्हा प्रशासन
झाले मतमोजणीसाठी सज्ज
उस्मानाबाद, दि.20- उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक
निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे
राजकीय भवितव्य ईव्हीएम मशीन मध्ये बंद झाले आहे. आता सबंध देशाचे लक्ष लागले आहे
ते 23 मे रोजी जाहीर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांकडे.
मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतन इमारत ,तुळजापूर रोड येथे सकाळी आठ वाजता
सुरू होईल. या कामाकरिता मतमोजणी पर्यवेक्षक,
सहाय्यक,तसेच इतर अधिकारी कमर्चारी असे मिळूण
एकुण 850 अधिकारी कमर्चारी ची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मतमोजणी प्रक्रिये
दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता पोलीस अधीक्षक आर.राजा व अप्पर पोलीस
अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली 3 पोलीस उपअधीक्षक,15 पोलीस निरीक्षक,
40 पोलीस उपनिरीक्षक आणि 450 पोलीस कर्मचाऱ्यांची फौज तैनात करण्यात आली आहे.
239 - औसा विधानसभा मतदारसंघाकरिता पहिल्या मजल्यावरील मतमोजणी
हॉल क्र. 118, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघाकरिता पहिल्या मजल्यावरील मतमोजणी हॉल
क्र. 111 तर दुसऱ्या मजल्यावर 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघाकरिता मतमोजणी हॉल
क्र 207, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघाकरिता मतमोजणी हॉल क्र 203, 243-परांडा
विधानसभा मतदारसंघाकरिता मतमोजणी हॉल क्र.206 तर 246- बार्शी विधानसभा मतदारसंघाकरिता
मतमोजणी हॉल क्रमांक 201 असे नियोजन करण्यात आले आहे.
239-औसा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र 304 होते, याकरिता
मतमोजणीच्या एकूण बावीस फेऱ्या होतील. 240-उमरगा विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्र
315 होते, याकरिता मतमोजणीच्या 23 फेऱ्या होतील. 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघात
मतदान केंद्र 402 होते, याकरिता मतमोजणीच्या 29 फेऱ्या होतील. 242-उस्मानाबाद
विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्र 411 होते, याकरिता मतमोजणीच्या 30 फेऱ्या होतील.
243-परांडा विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्र 369 होते, याकरिता मतमोजणीच्या 27
फेऱ्या होतील आणि 246 - बार्शी विधानसभा मतदारसंघात 326 मतदान केंद्र होते,
याकरिता मतमोजणीच्या एकूण चोवीस फेऱ्या होतील, असे एकूण 2हजार
127 मतदान केंद्राकरिता मतमोजणीच्या एकूण 155 फेऱ्या होणार आहेत.
मतमोजणी केंद्र परिसरात मोबाइल अथवा इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक
साहित्य घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाकरिता एकूण 14
मतमोजणी टेबल असतील तर टपाली व सैन्य मतदारांच्या मतमोजणीकरिता चार टेबल असणार
आहेत. उमेदवार व उमेदवारांचे प्राधिकृत प्रतिनिधी मतमोजणी हॉलमध्ये फिरून मतमोजणी
प्रक्रियेची पाहणी करू शकतात. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी हॉलमध्ये
फेरीनिहाय मतमोजणीची आकडेवारी बोर्डवर प्रदर्शित केली जाणार आहे. त्याचप्रमाणे
प्रत्येक फेरी निहाय मतमोजणीची आकडेवारी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षातून
ध्वनिक्षेपकाद्वारे उद्घोषित करण्यात येणार आहे. पार्किंग सुविधेबाबतही पोलिस
विभागाने आवश्यक ती सर्व व्यवस्था पूर्ण केली आहे.
मतमोजणी कक्षात मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचारी, मा.
निवडणूक निरीक्षक तथा मा. भारत निवडणूक आयोगाने निर्देशित केलेली व्यक्ती, उमेदवार
व त्यांचे निवडणूक प्रतिनिधी व मतमोजणी प्रतिनिधी यांनाच प्रवेश करता येईल.
पोस्टल मतपत्रिकांची मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू होईल व
त्यानंतर बरोबर 30 मिनिटांनी ईव्हीएम मतमोजणीस सुरूवात होईल. प्रति विधानसभा पाच
मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट मशीन ची मतमोजणी माननीय निवडणूक आयोगाने अनिवार्य
केली आहे. ईव्हीएम मशिनच्या मतमोजणीच्या फेऱ्या संपल्यानंतर व्हीव्हीपॅट मशीनची
मतमोजणी सुरू होईल.
अशा प्रकारे जिल्हा निवडणूक यंत्रणेने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-
मुंडे यांच्या कुशल नेतृत्वाखाली 23 मे रोजी होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेसाठी
आत्मविश्वासपूर्वक जय्यत तयारी केली आहे.
******
Subscribe to:
Posts (Atom)