Thursday, 23 March 2017

मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत जागतिक वन दिनानिमित्त स्वच्छता मोहीमेसह वृक्षलागवड कायर्क्रम



उस्मानाबाद,दि.22:-जागतिक वन दिनाचे औचित्य साधून येथील वनीकरण विभाग, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसरात स्वच्छता मोहीम राबवून अतिरिक्त जिल्हाधिकारी अविनाश पाठक व निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव यांच्या हस्ते वृक्ष लागवड कार्यक्रम साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक श्री. निकत, विभागीय वन अधिकारी राजेश्वर सातेलीकर, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री. उडानशिवे, संस्थेचे शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थींनी, प्रशासकीय इमारतीमधील अधिकारी व कर्मचारी यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय गीत गाऊन प्रशासकीय इमारत परिसरात स्वच्छतेबाबत घोषणा देवून इमारत परिसर दणाणून सोडला व स्वच्छता मोहीम हाती घेवून इमारत परिसरातील चारहीबाजूचा परिसर स्वच्छ केला.

यावेळी विद्यार्थ्यांनी काढलेल्या रॅलीत "कावळा करतो काव-काव, माणसा एक तरी झाड लाव", "गुटखा खा, जा मरून", "खाल्ला गुटखा, आला झटका", "उंची लोग, उंची पसंद, उंची बिमारी " व "इकडे तिकडे पाहू नका, इकडे तिकडे थुंकू नका" अशा प्रबोधनपर घोषणा दिल्या. यावेळी  औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी श्री.बी.बी. जाधव, शिल्पनिदेशक एस.टी. राऊत, डॉ. विलास जोंधळे,के.डी. नाईक, दयानंद विधाते उपस्थित होते.

जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी देशभक्तीपर एकपात्री एकांकिका सादर करून उपस्थितांची दाद  मिळवली. या एकांकिका  सादरी करणा नंतर  विद्यार्थींनी कु. रजनी भंणगे, कु. मोनिका गुट्टे, मिना गरगटे व सौ. स्वाती भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर विद्यार्थ्यांमधून अविनाश जावळे, अजय राऊत, अजिंक्य भातलवंडे, विनोद गिरी यांनी मनोगत व्यक्त करुन जिल्हा माहिती अधिकारी श्री. सानप यांचे आभार व्यक्त केले.


शेवटी सर्व विद्यार्थी, विद्यार्थींनीना जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने अल्पोपहार देण्यात आला व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.              

Monday, 20 March 2017

महिला बचत गटांच्या वस्तूना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची गरज -कुलगुरू डॉ. बी. वेंकटेश्वरलु



उस्मानाबाद,दि.19:-महिला बचतगटांनी निर्माण केलेलल्या वस्तूना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सर्वच घटाकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे,असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. वेंकटेश्वरलु यांनी केले.

कृषी विज्ञान केंद्र,तुळजापूर,उमेद,कृषी विभाग,आत्मा,स्वयंशिक्षण प्रयोग  यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विज्ञान केद्र,तुळजापूर येथे आयोजित कृषी तंत्रज्ञान महोत्सवात महिला मेळाव्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी  उपस्थितांच्या हस्ते क्रांतीज्योती  सावित्रीबाई  फुले व वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्ज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी आत्माचे प्रकल्प  संचालक विजय हिरेमठ, आत्माचे प्रकल्प उपसंचालक श्री. चोले, विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ.अशोक ढवण, कृषी  विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ  प्रा.सचिन सूर्यवंशी,डॉ.अनिता जिंतूरकर,डॉ.विलास टाकणखार,प्रा.अपेक्षा कसबे आदींची  प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी पुढे बोलताना कुलगुरू डॉ.वेंकटेश्वरलु म्हणाले की, उस्मानाबाद जिल्हा व मराठवाडयातील महिला बचतगट विविध वस्तूंच्या निर्मितीसाठी सक्षम आहेत.त्यांना शासनाच्या विविध योजनेतून पाठबळही मिळत आहे. मात्र बचत गटानी निर्माण केलेल्या मालाला योग्य  भाव (मार्केटिंग) मिळण्यासाठी योग्य बाजारपेठेची गरज आहे.ही बाजारपेठ उपलबध करून देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेवून मोठ-मोठया कंपनीच्या  वस्तू न खरेदी करता, महिला गटांनी तयार केलेल्या वस्तू खरेदी कराव्यात,जेणे करून त्यांना मार्केटिंगची अडचण येणार नाही.

यावेळी डॉ.ढवण म्हणाले की, वैचारिक सक्षमिकरणाची  प्रक्रिया पूर्ण झाली तर आर्थिक्‍ सक्षमिकरण होण्यास मोठी मदत होणार आहे.

यशस्वी महिला गटांचा यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. विवम घनकचरा व्यवस्थान,औरंगाबादच्या श्रीमती.निर्मला कांदलगावकर,विद्यापीठ कार्यकारणी सदस्य आनंद चोंदे,शास्त्रज्ञ डॉ.अप्पाजी चारी, जिल्हा परिषदचे स्वच्छ भारत मिशनचे रमाकांत गायकवाड व महिला शेतकरी यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शनपर भाषन केले.

या कृषी तंत्रज्ञान महोत्सवात महिला बचतगटानी बनविलेल्या विविध  वस्तूचे दहा स्टॉल लावण्यात आले होते.वस्तू खरेदीसाठी तुळजापूर व परिसरातील  महिलांनी  या  स्टॉलवर  मोठी  गर्दी  केली  होती.


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले व उमेदचे तालुका समन्वयक संदिप दाभाडे यांनी केले,तर सूत्रसंचालन व आभार रमेश पेठे यांनी मानले. यावेळी  या महिला  मेळाव्याला महिला  बचतगट, शेतकरी  महिला  मोठ्या  संख्येने  उपस्थित  होत्या. 

Saturday, 18 March 2017

स्वाधार योजनेचे अर्ज करण्यासाठी 23 मार्च पर्यंत मुदतवाढ



         उस्मानाबाद.दि. 17: शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या अनु. जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना भोजन, निवास व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन घेण्यासाठी रोख रक्कम त्यांच्या आधार संलग्न खात्यात जमा करण्याबाबतची डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेबाबत विद्यार्थ्यांकडून समक्ष / टपालाद्वारे कार्यालयाच्या ई-मेल वर अर्ज स्विकृत करण्यासाठी मुदत दिनांक 23 मार्च 2017 पर्यंत वाढविण्यात येत आहे,असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण उस्मानाबाद यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.