उस्मानाबाद 23 :-
कोरडवाहू शेती अभियान अंतर्गत मौजे मेडसिंगा व उन्नत शेती समृध्द शेतकरी
अभियानांतर्गत यांत्रकीकरण घटकाखाली निवड झालेल्या लाभार्थ्यांना जिल्हाधिकारी
राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणाने ट्रॅक्टर
वाटप करण्यात आले.
महेश लाकाळ
(भिकारसारोळा), सूर्यकांत चंद्रकांत कदम(मेडसिंगा), बापू सोपान शित्रे (मेडसिंगा),
अंगद महादेव शित्रे(मेडसिंगा) या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात आला आहे.
या कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
श्री. घाटगे, कृषी उपसंचालक एस.आर.चोले, तालुका कृषी अधिकारी ए.जी.देशमुख, सरपंच सौ.
संगिता दत्तात्रय आगळे, उपसरपंच श्री. सुधीर शिवाजी पाटील, मेडसिंगा पॅटर्नचे जनक,
नितीन राऊत , दत्तात्रय आगळे इतर ग्रामस्थ हजर होते.