उस्मानाबाद दि.22:- उस्मानाबाद जिल्हयात आठ
तालुक्यांमध्ये पुढील 15 दिवस बेटी बचाओ बेटी पढाओ व माझी कन्या भाग्यश्री या
योजनेच्या प्रचारासाठी मोबाईल व्हॅन फिरणार आहे. या व्हॅनचे नुकतेच जिल्हा परिषद
उपाध्यक्षा अर्चना पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती सखुताई पवार, जिल्हा
परिषद सदस्या सक्षणा सलगर, जिल्हा परिषद सदस्य संदीप मडके, रमेश पवार, उपमुख्य
कार्यकारी अधिकारी (बा.क.) बी.एच. निपाणीकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

