Thursday, 22 March 2018

क्रीडा शिक्षकांचा प्रशिक्षण शिबिरास उत्साही प्रतिसाद



उस्मानाबाद दि.22:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ,उस्मानाबाद तर्फे जिल्हयात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन ,प्रचार,प्रसार व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण असण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण 2012 अन्वये खेळातील बदललेले आधुनिक तंत्रज्ञान,प्रशिक्षणार्थी पध्दती,नवीन खेळ,खेळाची शास्त्रीय माहिती वेळोवेळी क्रीडा शिक्षकांना माहिती व्हावी व त्यांच्या ज्ञानात भर पडावी, या उद्देशाने जिल्हास्तर क्रीडा शिक्षकांचे आठ दिवसाचे निवासी जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे.
या शिबिरामध्ये दहा खेळाचे अद्ययावत प्रशिक्षण  दिले जाणार आहे.1. फूटबॉल 2. हॉकी 3. कुस्ती 4. खो-खो 5. ॲथलॅटिक्स 6. धर्नुविद्या 7. हॉलीबॉल 8. बास्केटबॉल 9. बॅडमिंटन 10. कबड्डी 
          या शिबिरासाठी एकूण 100 क्रीडा शिक्षकांची निवड केली जाणार असून यासाठी पात्रता निकष 1. जिल्हयातील ज्या शाळेचे अधिक संघ क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होऊन प्रावीण्य मिळवत असणाऱ्या शाळांचे शिक्षक 2. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू असलेले शिक्षक 3. तसेच उच्चतम क्रीडा अर्हता प्राप्त शिक्षक (एन.आय.एस,एम.पी.एड.,बी.पी.एड.) इच्छुक क्रीडा शिक्षकांनी दि. 23 मार्च पर्यंत आपली नावे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,उस्मानाबाद येथे कार्यालयीन वेळेत नोंदणी करावी, असे जिल्हा क्रीडा अधिकारी संजय महाडिक यांनी यावेळी केले आहे.