उस्मानाबाद
दि.20:- जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद
आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने
बळीराजा चेतना अभियानांतर्गत नोंदणीकृत विवाह योजनेत शेतकरी, शेतमजूर, अल्प उत्पन्न
गटातील व आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विवाहबध्द झालेल्या 27 जोडप्यांना प्रती 15
हजार रुपये प्रमाणे धनादेश वाटपाचा
कार्यक्रम दि. 19 मार्च रोजी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते जिल्हा
परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडला.
या
कार्यक्रमास जिल्हा पुरवठा अधिकारी
श्रीमती शिल्पा करमरकर, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, जिल्हा महिला व
बाल विकास अधिकारी अशोक सावंत, तहसिलदार सुजित नरहरे, नायब तहसिलदार चंद्रकांत
शिंदे आदी मान्यवर व लाभार्थी महिला उपस्थित होत्या.