शिक्षक मतदारसंघ निवडणूक -2017
उस्मानाबाद,दि.1:-औरंगाबाद विभाग शिक्षक
मतदारसंघ निवडणूक -2017 साठी दिनांक 3 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान होणार
आहेत. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या
दिवशी संबंधित मतदारसंघातील मतदारांना विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्याचे निर्देश
विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांनी दिले असल्याचे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी , उस्मानाबाद यांनी एका प्रसिध्दी
पत्रकाद्वारे कळविले आहे.