उस्मानाबाद , दि. 31:- आदिवासी विभाग विभागामार्फत अनुसूचित जमातींच्या विद्यार्थ्यांना इयत्ता 1 ली मध्ये नामांकित
इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेशाबाबतची योजना
सन 2017-18 या वर्षाकरिता राबविण्यात येत आहे . यासाठी पात्र व इच्छूक
लाभार्थ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन , प्रकल्प अधिकारी , एकात्मिक
आदिवासी विकास प्रकल्प , सोलापूर यांनी
कळविले आहे .
या योजनेसाठीच्या अटी व शर्ती
पुढीलप्रमाणे आहेत - विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा,जर विद्यार्थी दारिद्र्य
रेषेखालील असेल तर त्यासंबंधिच्या यादीतील अनुक्रमांक नमूद करण्यात यावा, विद्यार्थ्याचे
वय 5 वर्ष पूर्ण असावे,विद्यार्थ्याचा जन्म दि.1 जून 2011 ते 1 जून 2012 दरम्यान
झालेला असावा, जन्म तारखेसाठी ग्रामसेवक अथवा अंगणवाडीचा दाखला देण्यात यावा, 1 ली
मध्ये प्रवेश घेण्यास पात्र विद्यार्थ्यांची जाहीर सूचनेद्वारे माहिती मागवून
पालकांनी नजीकच्या प्रत्येक शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापकामार्फत विशिष्ट
कालावधीत नाव नोंदणी करावी .
या योजनेचा लाभ घेऊ
इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी सहमतीपत्र व शाळेत प्रवेशासाठी अर्जही
द्यावस.तसेच अर्जासोबत दोन पासपोर्ट साईज फोटो,जातीचा दाखला, रहिवासी दाखला, उत्पनाचा
दाखला इ. अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे . इ.1 ली च्या विद्यार्थ्याची परीक्षा घेतली
जाणार नसून शारिरीक पात्रता व मान्यता प्राप्त वयाचा विचार केला जाईल,अर्जासोबत
विद्यार्थ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडण्यात यावे, आदिवासी जमातीच्या
विद्यार्थ्यांची तसेच अपंग/विधवा/घटस्फोटित /निराधार /परितक्त्या व दारिद्र्य
रेषेखालील कुटुंबातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची प्राधान्याने निवड करुन
त्यांना नामांकित शाळामध्ये प्रवेश दिला जाईल,विद्यार्थ्यांचे पालक शासकीय
/निमशासकीय नोकरदार नसावेत व खोटी माहिती सादर केल्यास प्रवेश रदृ करण्यात
येईल,निवड केलेल्या विद्यार्थ्याला एकदा शाळा निश्चित झाल्यानंतर कोणत्याही
परिस्थितीत पालकांच्या व पाल्यांच्या विनंतीनुसार शाळा बदलता येणार नाही,रुपये 1
लाख वार्षिक उत्पन्न मर्यादा व सक्षम अधिकाऱ्यांचे जातीचे प्रमाणपत्र असलेल्या
अनुसूचीत जमातीच्या इच्छूक पालकांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी दि.1 फेबु्वारी
2017 पासून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत.संपर्कासाठी दूरध्वनी क्र.(0217)-2607600
,मो.नं. 7276202249 क्रमांक असे आहेत.