उस्मानाबाद, दि. 30:-वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र,तुळजापूर आणि
आत्मा,उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवशीय दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण
दि.21 ते 25 जानेवारी 2017 या कालावधीत मौजे करजखेडा ता.जि. उस्मानाबाद येथे
यशस्वीरित्या राबविण्यात आले. या प्रशिक्षणाच्या उदघाटन कार्यक्रमास प्रकल्प
उपसंचालक(आत्मा) सुभाष चोले, प्रा.वर्षा मरवाळीकर,डॉ.प्रभाकर पडधन व
श्री.पवार हे उपस्थित होते.
या प्रशिक्षणामध्ये मौजे
करजखेडा येथील महात्मा फुले रेशीम उद्योजक समुहातील सदस्यांना दुग्ध व्यवसायाचे
व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये दुधाळ जनावरांची निवड, चारा
व्यवस्थापन, आहार व्यवस्थापन,मुक्त संचार, गोठा पध्दत, दुध साठवण्याच्या पध्दती व
दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच पनीर,खवा,बासुंदी,लस्सी
इत्यादी दुग्धजन्य पदार्थ निर्मीतीचे प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. शेतक-यांना या
व्यवसायासाठी अधिक माहिती मिळावी व व्यवसाय यशस्वीपणे कशा प्रकारे केला पाहिजे
याकारिता प्रशिक्षणार्थ्यांना उस्मानाबाद
जिल्हयातील यशस्वी दुग्धपालन व उत्पादक यांच्या प्रक्षेत्रावर भेटी दिल्या.
या
कार्यक्रमाची सांगता दि.25.जानेवारी रोजी वरिष्ठ शास्त्र तथा प्रमुख कृषि विज्ञान
केंद्र प्रा.सचिन सूर्यवंशी,जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शिरीष जमदाडे, एस.आर.
खरात,अरुण गुट्टे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करुन करण्यात आली.
या
प्रशिक्षणाचे प्रशिक्षण समन्वयक म्हणून शास्त्रज्ञ (पशुविज्ञान)डॉ.ए.एस.जिंतूरकर
यांनी काम पाहिले. *****