उस्मानाबाद.दि.31:- सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य
व विद्यार्थ्यांसाठी सी बीएसई / आसीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमासाठी ज्या अनुसूचित
जातीच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता 11 वी व 12 वी मध्ये प्रवेश घेतलेले आहेत त्याच्यांसाठी
ऑनलाईन शिष्यवृत्ती, शिक्षण फी चे अर्ज भरण्यासाठी http://mahaeschol.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ सुरु करण्यात
आले आहे.
जिल्हयातील सीबीसीएसई / आयसीएसई बोर्डाच्या
अभ्यासक्रमासाठी ज्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता 11 वी व 12 वी
मध्ये प्रवेश घेतलेले आहेत त्यांनी सन 2016-17 साठी ऑनलाईन अर्ज भरुन आपला युझर
आयडी व पासवर्ड प्राप्त करुन घेणे व
महाविद्यालयाने संबंधित शिष्यवृती, शिक्षण फी व परीक्षा फी साठी पात्र विद्यार्थ्यांच्या
जुन्या अर्जांच्या
नुतणीकरणाची प्रक्रीया विहित कालावधीत करुन घ्यावी . याकरिता सर्व प्राचार्यांना व
विद्यार्थ्यांनी सन 2016-17 या कालावधीचे जिल्हयातील सीबीएएसई / आयसीएसई
बोर्डाच्या इयत्ता 11 वी व12 वी साठी प्रवेश घेतलेल्या अनु. जातीच्या
विद्यार्थ्यांनी विहीत कालावधीत आपले ऑनलाईन शिष्यवृत्ती, शिक्षण फी व परीक्षा फी
चे अर्ज विहीत कालावधीत सादर न केल्यास या विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती,
शिक्षण फी अदा करण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची असेल व याबाबत सामाजिक
न्याय विभागाची जबाबदारी राहणार नाही याची नोंद घ्यावी, असे सहायक आयुक्त, समाज
कल्याण यांनी कळविले आहे .