उस्मानाबाद,दि.27:- बालकांच्या
मोफत आणि सक्तीच्या शिक्षणांतर्गत दुर्बल आणि वंचित घटकांना विनाअनुदानित आणि कायम
विनाअनुदानित शाळांमध्ये किमान 25 टक्के तरतूद आहे. सर्व पात्र शाळांच्या मुख्याध्यापकांनी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची
माहिती फलकावर दर्शनी भागावर लावावी. प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक पुढीलप्रमाणे
आहे.
दिनांक 16 जानेवारीपासून शाळांची नोंदणी सुरु केलेली आहे. ही
नोंदणी 19 दिवस चालेल. शाळांच्या नोंदणीनंतर लगेच पालकांना 5 फेब्रुवारीपासून
प्रवेशासाठी अर्ज करावयाचे आहेत. सध्या पाच सोडतीचे वेळापत्रात जाहीर करण्यात आले आहे.
त्यानुसार पहिली सोडत 27 फेबुवारीला काढण्यात येणार आहे. प्रत्येक सोडतीनंतर
उर्वरित जागा शाळांना दर्शवायच्या आहेत. त्यानुसार नंरतरच्या सोडतीमधील प्रवेश
निश्चित होणार आहेत. संपूर्ण प्रक्रिया एप्रिलपर्यंत
चालणार आहे.
पालकांनी आपल्या नजिकच्या शाळेमध्ये प्रवेशासाठी
ऑनलाईन अर्ज करावेत. वंचित (s.c.s.t व विकलांग) दुर्बल घटक (ज्याच्या कुंटुंबाचे
एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये 1 लक्ष पर्यंत आहे असे खुल्या प्रवर्गासह,विमुक्त
वभटक्या जाती,इतर मागास विशेष मागास व धार्मिक अल्पसंख्यांक म्हणजेच
मुस्लीम,बौध्द,ख्रिश्चन,पारसी,जैन व शीख)यांचेसाठी राखीव ठेवलेल्या आहेत. अशा
शाळांमधून (जी शाळा आपल्या निवासापासून 1 कि.मी. अंतरावर आहे) आपल्या पाल्याचा
प्रवेश नर्सरी (इ.1 ली पुर्वी 3 वर्षे) / इ.1 ली मध्ये घेता येईल त्यासाठी पालकांस
rte25admission.Maharashrta.gov.in या संकेतस्थळावर Online Admission portal वर
जाऊन New Registriation ला क्लिक करावे लागेल. क्लिक केल्यानंतर विदयार्थ्यांचे नाव,
जन्मतारीख, जिल्हा व मोबाईल क्रमांक ही महिती भरावी लागेल. ही महिती भरल्यानंतर Registriation
या ठिकाणी क्लिक करावे. पालकांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर पालकांना sms व्दारे Application
ID व password मिळेल. त्यावरुन पहिल्या वेळी login करताना Application ID हा
क्रमांक Application Number या ठिकाणी टाकावा व Password च्या ठिकाणी मोबाईलव्दारे
मिळालेला Password टाकावा. त्यावेळी Password बदलाची सूचना मिळेल Password बदलताना 6
व जास्तीत जास्त 10 अक्षरांचा नवीन Password तयार करावा. (त्यामध्ये किमान एक alphabet,
एक –नंबर व एक स्पेशल कॅरेक्टर (उदा. # * @ इत्यादी असावे) बदलेला Password
पालकांच्या मोबाईल क्रमांकावर SMS व्दारे
प्राप्त होईल.
Password गहाळ
झाल्यास Application Number टाकून मुलांची जन्मतारीख टाकावी. Password दिलेल्या
मोबाईल क्रमांकावर पुन्हा प्राप्त होईल
अर्ज भरताना कागदपत्रे Uplod करावयाची गरज नाही. परंतू
प्रवेशासाठी आवश्यकता आहे ती खालील प्रमाणे
वंचित घटकासाठी जातीचे प्रमाणपत्र (वडिलांचे) तहसिलदार/उपजिल्हाधिकारी/उपविभागीय अधिकारी, जन्माचा
दाखला-ग्रा.प./न.पा./मनपा/रुग्णालयातील ANM रजिस्टर मधील दाखला/अंगणवाडी,बालवाडी
रजिस्टर मधील दाखला अथवा आई/वडीलाचे प्रतिज्ञापत्राव्दारे केलेले स्वनिवेदन, बालकांचे
रंगीत छायाचित्र- पासपोर्ट साईज, रहिवासी पुरावा-आधार कार्ड/पासपोर्ट/निवडणूक
ओळखपत्र/लाईटबील/टेलीफोन बील/घरपटटी/वाहन चालवण्याचा परवाना इत्यादी.दुर्बल घटक रहिवासी
पुरावा वरील प्रमाणे उत्पन्न दाखला तहसिलदार/नायब तहसिलदार यांचा आर्थिक यांचा आर्थिक
वर्ष 2015-16 जन्माचा दाखला वरील प्रमाणे रंगीत फोटो (बालकांचा), अपंगासाठी (40% पेक्षा जास्त अपंगत्व
प्रमाणपत्र) आदी कागदपत्रे अर्ज भरताना पालकांनी सोबत घेऊन जावीत.यासाठी वेळापत्रक
पुढीलप्रमाणे आहे. शाळा नोंदणी दि.23जानेवारी ते 3 फेब्रवारी 2017, ऑनलाईन अर्ज
(प्रवेशासाठी) दि.5 ते 21 फेब्रुवारी 2017, पहिली सोडत दि.27व 28 फेब्रूवारी 2017,
प्रवेशाला सुरवात दि.1 ते 9मार्च 2017, प्रवेशानंतर रिक्त पदांची जागा दर्शविणे
दि.10 व 11 मार्च 2017, दुसरी सोडत दि.14 व 15 मार्च 2017, प्रवेश सुरू दि.
27फेब्रूवारी ते 1 मार्च 2017, रिक्त जागा दर्शविणे दि.22व 23मार्च 2017,तिसरी
सोडत दि.24 व 25 मार्च 2017, रिक्त जागा दर्शविणे दि.3 ते 6 एप्रिल 2017,चौथी सोडत
दि.7 व 8 एप्रिल 2017, पाचवी सोडत दि.18 ते 20 एप्रिल 2017 रोजील होईल.अधिक
माहितीसाठी संबंधित तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती यांच्याशी संपर्क
साधावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सचिन जगताप यांनी केले आहे.