उस्मानाबाद, दि:- 27 क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्या
पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,उस्मानाबाद च्या वतीने जिल्हास्तर युवा
प्रशिक्षण (निवासी) शिबिराचे आयोजन दिनांक 01 फेबु्रवारी 2017 ते 10 फेबु्रवारी 2017 या कालावधीत श्री. तुळजाभवानी
जिल्हा क्रीडा स्टेडीयम उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात येत आहे.
प्रशिक्षणात
सहभागी होणारे युवक हे 15 ते 29 वर्ष या
वयोगटातील असतील सदरचे प्रशिक्षण हे अतंरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर विविध
विषयात युवकांनी पार पाडलेल्या भुमिका दिलेले योगदान यामुळे युवाचे एक अव्दितीय
समुह अशी ओळख समाजात झालेली आहे. युवाना मानव संशोधन विकासाचा मुख्य स्त्रोत म्हणून
देखील मान्याता देण्यात आलेले आहे. युवा हा समाजाचा अविभाज्य घटक असुन विकास
प्रक्रीयतील आवश्यक भाग आहे. समाजातील युवांची संख्या पहाता त्याच्या साठी स्वतंत्र
विचार करण्याची आवश्यकता आहे. इच्छुक युगात नवीन आव्हांनाना तोंड देण्यासाठी
युवांच्या सक्षमीकरणाची गरज आहे.
युवा
सक्षमीकरण हे घरामधून,शाळा, महाविदयालयामधून,युवा मंडळाच्या माध्यमातून शासकीय
धोरणाच्या माध्यमातून विविध उपक्रमाचे आयोजन करणे शक्य आहे. याचाच भाग म्हणून
जिल्हा युवा प्रशिक्षण केंद्र,उस्मानाबाद अंतर्गत जिल्हायातील युवांना आधुनिक
तत्रांची ओळख करुन देऊन या स्पर्धच्या युगांत शक्तीशाली स्पर्धक म्हणून पुढे
आणण्याच्या उदेशाने दिनांक 01 फेब्रुवारी 2017 ते 10 फेबु्रवारी 2017 या कालावधीत
श्री.तुळजाभवानी जिल्हा क्रीडा स्टेडीयम उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात येत आहे.
जिल्हास्तर युवा प्रशिक्षण (निवासी) शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी इच्छुक
युवानी दिनांक 30 जानेवारी 2017 पर्यंत आपली नावे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय
उस्मानाबाद येथे कार्यालयीन वेळेत नोंद करावी असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी
श्री.संजय महाडीक यांनी केले आहे.