उस्मानाबाद,27 क्रीडा व युवक सेवा संचालनालय,
महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जिल्हा क्रिडा
प्रशिक्षण केंद्र, उस्मानाबाद व्दारे आयोजित फुटबॉल,हॉकी,कुस्ती खेळांच्या क्रीडा
प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन दि. 1 ते 10 फेब्रुवारी 2017 या कालावधीत रोज सकाळी,
संध्याकाळी विविध वयोगटाती मुले व मुली यांचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.
या शिबिरात
येणा-या विविध शाळेतील खेळाडूंना तांत्रिक व तंत्रशुदध पध्दतीने विविध खेळाचे
क्रीडा मार्गदर्शन विविध खेळाचे मार्गदर्शन करणार आहे. प्रत्येक तीन प्रकार च्या
खेळात 50 प्रमाणे निवड करण्यात येईल व त्यांना वर्षभर जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालय तर्फे विनामूल्य खेळाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तरी या संधीचा सर्व
शाळातील खेळाडूंनी फायदा घ्यावी असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.संजय महाडीक
यांनी केले आहे.
ज्या
खेळाडूंना सहभाग घ्यावयाचा आहे त्यांनी दि.29 जानेवारी 2017 पर्यंत शाळेच्या
पत्रासह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,श्री.तुळजाभवानी क्रीडा स्टेडीयम
उस्मानाबाद येथे नोंदणी करावयाची आहे. अधिक महितीसाठी 012472221818 या दूरध्वनी वर
संपर्क करावे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी संजय महाडिक यांनी प्रसिध्दी
पत्रकाद्वारे कळविले आहे.