Monday, 23 March 2026

मतदार यादी विशेष पुनरिक्षणासाठी जिल्ह्यातील संगणक लॅब अधिग्रहित

मतदार यादी विशेष पुनरिक्षणासाठी जिल्ह्यातील संगणक लॅब अधिग्रहित धाराशिव दि.२० मार्च (जिमाका) भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लवकरच मतदार यादींचे विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (Special Intensive Revision) राज्यात सुरू करण्याची घोषणा होणार आहे.त्यानुसार मुख्य निवडणूक अधिकारी,महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाकडून मतदार यादींच्या पुनरिक्षण पूर्व उपक्रमाची तयारीबाबत लेखी निर्देश दिलेले आहेत.त्यानुसार मतदार यादीमध्ये असलेल्या मतदारांचे सन २००२ रोजीच्या मतदार यादीतील मतदारांशी मतदार मॅपिंग करणे, अस्पष्ट (Blur Photo) मतदारांचे नवीन रंगीत फोटो गोळा करून अद्यावत करणे,तसेच DSE च्या नोंदीची पडताळणी करून त्यावर योग्य ती कार्यवाही करणे इत्यादी कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील २४०-उमरगा,२४१-तुळजापूर, २४२-उस्मानाबाद व २४३-परंडा विधानसभा मतदारसंघातील सर्व BLO व BLO Supervisor यांनी मतदारांचे मॅपिंग करणे,अस्पष्ट असलेले (Blur Photo) फोटो गोळा करून अद्यावत करणे,तसेच DSE च्या नोंदीची पडताळणी करणे या कामकाजासाठी दिनांक २०.०३.२०२६ ते २१.०३.२०२६ या कालावधीत पूर्णवेळ सेवा अधिग्रहित केली असल्याने SIR संदर्भातील संगणकीय कामकाज करण्यासाठी तालुकानिहाय औद्योगिक संस्था / महाविद्यालयाच्या संगणक लॅब इंटरनेट सुविधेसह तसेच संगणक हाताळणारे ५ तांत्रिक कर्मचारी यांची सेवा या आदेशान्वये दिनांक २०.०३.२०२६ ते ३१.०३.२०२६ या कालावधीत करिता खालील प्रमाणे अधिग्रहित करण्यात येत आहेत. यामध्ये धाराशिव तालुक्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन,धाराशिव; तुळजापूर तालुक्यासाठी श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय कंप्युटर लॅब, तुळजापूर; लोहारा तालुक्यासाठी श्री स्वामी रामानंद तीर्थ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,लोहारा; उमरगा तालुक्यासाठी इंदिरा वेदप्रकाश शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,उमरगा; कळंब तालुक्यासाठी संत गोरखाबाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,कळंब; वाशी तालुक्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,वाशी; भूम तालुक्यासाठी आचार्य विद्यासागरजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,भूम; तसेच परंडा तालुक्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,परंडा या संस्थांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे वरील औद्योगिक प्रशिक्षण संस्था / महाविद्यालयाच्या संगणक लॅब,इंटरनेट सुविधेसह दिनांक २०.०३.२०२६ ते ३१.०३.२०२६ या कालावधीत सेवा अधिग्रहित करण्यात येत असून,संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून मतदार यादी विशेष पुनरिक्षणाची प्रक्रिया वेळेत व अचूकरीत्या पूर्ण करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. *****