Monday, 23 March 2026

पीसीपीएनडीटी अंतर्गत जिल्हा सल्लागार समितीसाठी स्वयंसेवी संस्थांकडून अर्ज आमंत्रित

पीसीपीएनडीटी अंतर्गत जिल्हा सल्लागार समितीसाठी स्वयंसेवी संस्थांकडून अर्ज आमंत्रित धाराशिव,दि.२४ मार्च (जिमाका) जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, धाराशिव यांच्या वतीने Pre-Conception and Pre-Natal Diagnostic Techniques (PCPNDT) Act अंतर्गत जिल्हास्तरावर कार्यरत जिल्हा सल्लागार समितीवर सदस्य म्हणून काम करण्यासाठी पात्र व इच्छुक स्वयंसेवी संस्था (NGO) कडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या समितीवर सदस्य म्हणून काम करण्यासाठी अर्ज करणाऱ्या संस्थांनी शासनमान्य नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.तसेच महिला व बालकल्याण,आरोग्य,जनजागृती आदी क्षेत्रात कामाचा अनुभव असणे बंधनकारक असून संबंधित क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक आहे. अर्जासोबत संस्था नोंदणी प्रमाणपत्र, मागील कामाचा अहवाल किंवा अनुभव प्रमाणपत्र,संस्थेची सविस्तर माहिती (प्रोफाईल) तसेच इतर आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. इच्छुक संस्थांनी आपले अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांसह २८ मार्च २०२६ पर्यंत जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय,धाराशिव येथे सादर करावे. प्राप्त झालेल्या अर्जांपैकी संबंधित समितीवर नियुक्ती करण्याचे सर्वस्वी अधिकार धाराशिव येथील (PCPNDT) जिल्हा सल्लागार समितीकडे राहतील. नियुक्त करण्यात येणाऱ्या सदस्यांना कोणत्याही प्रकारचे मानधन,भत्ता किंवा पगार देय राहणार नसल्याची नोंद घेणे आवश्यक आहे.अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक तथा जिल्हा समुचित प्राधिकारी डॉ. धनजय चाकुरकर यांनी दिली. *****