Wednesday, 25 March 2026

जनगणना-२०२७ पूर्वतयारीला वेग; जिल्ह्यात व्यापक नियोजन आणि प्रशिक्षणास सुरुवात

जनगणना-२०२७ पूर्वतयारीला वेग; जिल्ह्यात व्यापक नियोजन आणि प्रशिक्षणास सुरुवात धाराशिव,दि.२५ मार्च (जिमाका) आगामी जनगणना-२०२७ च्या संदर्भात राज्यातील सर्व शहरी व ग्रामीण भागात जनगणनेच्या पूर्वतयारीची सुरुवात झाली असून जनगणना कामाबाबत संयुक्त सचिव भारत सरकार व मुख्य प्रधान जनगणना अधिकारी,मुंबई यांनी जनगणना बाबत टप्पेनिहाय कार्यवाही करण्याबाबत कालमर्यादा निश्चित करून दिली आहे. जनगणना-२०२७ चे सर्वेक्षण शासन व जनगणना कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य,मुंबई यांचे स्तरावर वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांच्या प्रमाणे क्षेत्रीय कार्यक्षेत्रस्तरावर जनगणना संदर्भात घर यादी आणि गृहनिर्माण गणना (जनगणना २०२७ चा पहिला टप्पा) ही संयुक्तपणे राबविण्यात येणार असून यासाठी जिल्हाधिकारी यांना जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व मुख्याधिकारी हे संबंधित कार्यक्षेत्रात चार्ज जनगणना अधिकारी म्हणून कामकाज करणार आहेत. जिल्ह्यात एकूण ८ सर्व तहसीलदार व एकूण १० मुख्याधिकारी हे संबंधित कार्यक्षेत्रात चार्ज जनगणना अधिकारी म्हणून कामकाज करणार आहेत.तसेच जिल्ह्यात जनगणनेसाठी Total No Of House listing Block No (HLB)- २८५०,Master Trainers -०२,Field ट्रेनर ५२, Enumerators- २८५०, Supervisors- ६२,Total No Of Training Venues-१८ निश्चित करण्यात आले आहेत. जिल्ह्यात सर्व चार्ज जनगणना अधिकारी यांच्या कार्यालयस्तरावर जनगणना कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी, धाराशिव व जिल्हा जनगणना अधिकारी तसेच निवासी उपजिल्हाधिकारी, धाराशिव यांच्या अधिनस्त जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून तहसीलदार व महसूल व तहसीलदार संगायो यांची सहनियंत्रक म्हणून नियुक्ती करून सदर कामकाजासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. भारत सरकारच्या सहसचिव व मुख्य प्रधान जनगणना अधिकारी, जनगणना संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यपद्धतीनुसार जनगणना-२०२७ च्या कामासाठी उपयुक्त भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व चार्ज जनगणना अधिकारी, जनगणना लिपिक आणि तांत्रिक सहाय्यक यांना घर यादी आणि गृहनिर्माण गणना (जनगणना २०२७ चा पहिला टप्पा) अंतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात जनगणना-२०२७ पहिला टप्पा अंतर्गत, जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी, धाराशिव यांच्या अध्यक्षतेखाली किरण गुरव, सहसंचालक, जनगणना संचालनालय, मुंबई व पवण घाडे, निरीक्षक,जनगणना संचालनालय, मुंबई यांच्या उपस्थितीत सर्व चार्ज जनगणना अधिकारी,जनगणना संबंधित कर्मचारी व तांत्रिक सहाय्यक यांना नियोजन भवन सभागृह,जिल्हाधिकारी कार्यालय परिसर,धाराशिव येथे दिनांक २६ मार्च,२७ मार्च व २८ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ****