उस्मानाबाद,दि.15:- श्री तुळजाभवानी
नवरात्र महोत्सवास महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यांमधून यात्रेकरु मोठ्या संख्येने दाखल
होतात. येणाऱ्या भाविकांना दर्शन सुलभरित्या व्हावे म्हणून सर्व विभागांनी काळजी घ्यावी,
असे निर्देश जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी दिले.
शारदीय नवरात्र उत्सवासंदर्भात
पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री.गमे यांनी तुळजापूर येथील विश्रामगृहात घेतली.यावेळी
ते बोलत होते.
यावेळी अपर जिल्हाधिकारी अविनाश
पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी श्रीमती.शिल्पा करमरकर,चेतन
गिरासे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एकनाथ माले,
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.वडगावे,आदींसह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री.गमे
पुढे बोलताना म्हणाले की, शारदीय नवरात्र महोत्सवात राज्यासह परराज्यातून भाविक मोठया
संख्येने दर्शनासाठी येतात दर्शन सुलभरित्या व्हावे म्हणून सर्व विभागांनी काळजी घ्यावी,
त्याचबरोबर पाण्याचे व अन्नाचे नमुने रोजच्या रोज तपासणी करावे, महाप्रसादाच्या पॅकिंग,लाह्या
अन्य विक्रीचे साहित्य वजन बरोबर आहे व मूळ किंमतीला विकले जाते का ते पाहावे, कुंकवाचे
तपासणी नमुने घ्यावेत व भेसळयुक्त विक्री करणाऱ्यावर कारवाई करावी, यासाठी वैधमापन
व अन्न व औषध प्रशासन विभागाने संयुक्तपणे काम करावे, अशा सूचना यावेळी दिल्या. घरगुती
गॅस व रॉकेलचा गैरवापर करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश यावेळी श्री.गमे यानी दिल्या.
सर्व हॉटेल व तुळजापूर मार्गावरील
धाब्याचे पाणी नमुने रोजच्या रोज तपासणी करावेत व पाण्याच्या दूषित ठिकाणांना रेड लेबल
लावून सिल करावे, एस. टी स्टॅन्डवर भाविकांच्या सोयींसाठी विशेष गाड्यांची सोय करुन
त्याबाबतच्या सूचना ध्वनीक्षेपणाद्वारे वेळोवेळी देण्यात याव्यात, प्राथमिक उपचारकेंद्रात
येणाऱ्या भाविकांना बसण्याची व पाण्याची सोय करावी, अवैध दारु विक्री व वाहतुकीवर व गुटखा
विक्रीवर करवाई करण्याचे निर्देश
ही यावेळी श्री.गमे यांनी दिले.
नवरात्र उत्सवात श्री.तुळजाभवानी
देवीच्या दर्शनाला वाहनाने येणाऱ्या भाविकांची संख्यादेखील मोठी असते त्यामुळे पार्किंगची
व्यवस्था, एसटी महामंडळाने केलेल्या गाडयांची व्यवस्था, वीज वितरण कंपनी व अन्य विभागाने
केलेल्या सोयीसुविधा व इतर व्यवस्थासंबंधी यावेळी प्रत्येक विभागप्रमुखाकडून आढावा
घेण्यात आला