उस्मानाबाद,दि.11:-
बळीराजा चेतना अभियान या योजनेंतर्गत सामूहिक विवाह ही योजना जिल्हाधिकारी
कार्यालय उस्मानाबाद, व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय उस्मानाबाद
यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे.
एका ठिकाणी
कमीत कमी 05 सामूहिक विवाह आयोजित करण्यात यावे. या योजने अंतर्गत मुलीच्या
वडीलांना, वडील हयात नसतील तर आईस व दोघेही हयात नसतील तर मुलीस तिच्या विवाहासाठी
आवश्यक असलेल्या मंगळसूत्र व
इतर वस्तुची खरेदी करण्यासाठी प्रति जोडपे 15 हजार रुपये इतके अनुदान दिले जाईल. सामूहिक विवाह हे सामाजिक क्षेत्रात
कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्था व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामार्फत
आयोजित होणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत रुम न. 10
तळमजला, डावी बाजू, उस्मानाबाद येथे संपर्क फोन नं. 02472-222592 वर साधावा, असे
आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री.अशोक सावंत यांनी केले आहे.
अर्जासोबत
पुढील सत्यप्रत कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.
बालविवाह प्रतिबंध कायदा व हुंडा प्रतिबंध
कायद्यांतर्गत असलेल्या कोणत्याही कलमांतर्गत भंग या दाम्पत्य/कुटुंब यांच्याकडून
न झालेला नसावा याबाबतचे विहीत नमुन्यातील प्रतिज्ञापत्र (Affdavit) सादर करणे
आवश्यक आहे. (रु. 100 च्या स्टँप पेपरवर), जन्मनोंदणी प्रमाणपत्र किंवा शाळा
सोडल्याच्या दाखला किंवा वैद्यकीय अधिका-याचे वयाबाबतचे प्रमाणपत्र, महाराष्ट्र
राज्याचा अधिवास असल्याचा पुरावा, लाभार्थी हा शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून
संबंधित जमिनीचा सातबारा व त्या गावचे रहिवाशी असल्याबाबत त्या गावचे
तलाठी,ग्रामसेवक यांचा दाखला, लाभार्थी शेतमजूर असल्याबाबतचा पुरावा म्हणून
संबंधित गावचे तलाठी/ग्रामसेवक यांचा दाखला, वधूच्याआईचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र तहसिलदार/तलाठी,
विवाह नोंद प्रमाणपत्र, वधू- वरांचा लग्नाचा फोटो, वधूच्या आईचा पासपोर्ट फोटो आदी कागदपत्राची
पूर्तता करणे आवश्यक आहे ,असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.