उस्मानाबाद,दि.16:-अनुसूचित जातीतील शेतक-यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी
स्वावलंबन योजनेंतर्गत नवीन विहीर व इतर लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावेत.
डाँ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेंतर्गत अनुसूचित जाती/ नवबौध्द
शेतक-यांना अर्थसहाय्य देण्यासाठी उस्मानाबाद जिल्हयासाठी चालू वर्षात 116 नवीन
विहिरीचे लक्षांक प्राप्त झाले असून 350 लक्ष निधी उपलब्ध होणार आहे या
योजनेंतर्गत निवडलेल्या लाभार्थ्यांना नवीन विहीर रु 2.5. लाख जुनी विहीर दुरुस्ती
रु 50000/ इनवेल बोअरींग रु 20000/- पंपसंच रु 25000/- वीज जोडणी आकार रु 10,000/-
शेततळयाचे प्लॉस्टिक अस्तरीकरण रु 100000/- ठिबक सिंचन रु 50,000/- तुषार संच रु
25000/- या प्रमाणे पॅकेज स्वरुपात निवड झालेल्या लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार
आहे.
लाभार्थी हा अनुसूचित जाती/
नवबौध्द शेतकरी असला पाहिजे.शेतक-यांकडे सक्षम प्राधिका-यांने दिलेले जात
प्रमाणपत्र असले पाहिजे. शेतक-यांकडे त्याच्या स्वत:चे नावे किमान 0.40 हेक्टर व
कमाल 6.00 हेक्टर शेतजमीन असली पाहिजे. शेतक-यांच्या नावे जमीनधारणेचा 7/12 दाखला
व 8 अ उत्तारा असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे.
लाभार्थ्यांकडे बँक खाते असणे व सदर बँक खाते आधारकार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे.
द्रारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यास प्रथम प्राधान्य. द्रारिद्रय
रेषेखालील नसलेले अनुसुचित जाती/ नवबौध्द शेतक-यांचे सर्व मार्गाकने मिळणारे
वार्षिक उत्पन्न रु 15000/- पेक्षा जास्त नसेल तरच या योजनेचा लाभ घेण्यास पात्र
असतील.द्रारिद्र रेषेखालील (बीपीएल.) यादीत अतर्भूत शेतक-यांसाठी वार्षिक
उत्पनाच्या मर्यादेची अट राहणार नाही. परंतू ज्याचे सर्व मार्गानी मिळणारे वार्षिक
उत्पन रुपये 15000/-चे मर्यादित आहे, आशा शेतक-यांनी संबंधित तहसिदार यांचेकडून सन
2016-17 चा उत्पन्नाचा अद्यावत दाखला घेणे व अर्जा सोबत सादर करणे बंधनकारक राहील.
अधिक माहितीसाठी पंचायत
समितीस्तरावर गट विकास अधिकारी किंवा कृषि अधिकारी (विघयो) जिल्हास्तरावर जिल्हा
परिषदचे कृषि विकास अधिकारी जिल्ळा परिषद किंवा जिल्हा कृषी अधिकारी (विघयो)
यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा
परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कृषी विकास अधिकारी यांनी केले आहे.