उस्मानाबाद, दि.16:- रब्बी हंगाम सन 2017-2018 मध्ये निविष्ठ उपलब्धता व
निविष्ठांच्या गुणवत्तेबाबतच्या तक्रारींचे निराकरणकरण्यासाठी खरीप हंगामात 15
सप्टेंबर ते 30 नोव्हबर या कालावधीसाठी जिल्हास्तरावर कृषि विकास अधिकारी
कार्यालयात व तालुकास्तरावर गट विकास अधिकारी
कार्यालयात तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत. हा तक्रार
निवारण कक्ष सकाळी 10.00 ते सायंकाळी 7.00 वाजेपर्यंत कार्यान्वित राहातील, शेतक-यांना
कृषी निविष्ठा
( खते,बियाणे व किटकनाशके) विषयी असलेल्या अडचणी/ तक्रार सोडविण्यासाठी/
मार्गदर्शनासाठी या कक्षाशी संपर्क करावा. तक्रार बाबत कृषि विभागाच्या टोल फ्री
क्रमांक 18002334000 या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हयातील सर्व शेतकरी
बांधवांना कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्याकडूण करण्यात येत
आहे.
तक्रार निवार कक्षाचे संपर्क
क्रमांक खालील प्रमाणे आहेत.
कृषि विकास अधिकारी, जिल्हा
परिषद उस्मानाबाद,02472-223794,गट विकास अधिकारी, पंचायत समिती ,
उस्मानाबाद02472-222157, गट विकास अधिकारी, पंचायत समिती , उमरगा 02475-252027, गट
विकास अधिकारी, पंचायत समिती , लोहारा02475-266579, गट विकास अधिकारी, पंचायत समिती ,तुळजापूर
02471-242040, गट विकास अधिकारी, पंचायत समिती ,भूम 02478-272028, गट विकास
अधिकारी, पंचायत समिती ,परंडा 02477-232028, गट विकास अधिकारी, पंचायत समिती ,वाशी
02478-276900, गट विकास अधिकारी, पंचायत समिती ,कंळब 02473-262225 या दूरध्वनी
क्रमाकावर संपर्क साधावा, असे आवाहन कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद उस्मानाबाद
यांनी केले आहे.