उस्मानाबाद दि.1:- शासकीय
तंत्रनिकेतनमध्ये सुप्रसिध्द नाटककार, कविवर्य श्री.वि.वा. शिरवाडकर यांचा दि.27
फेब्रुवारी हा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला.
यावेळी प्रा.श्री. आर.एच.देशमुख यांच्या व्याख्यानाचा
कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य प्रा.डॉ. एस.टी. बिडकर हे होते. कार्यक्रमाचे
प्रस्ताविक प्रा.व्ही.डी.बिराजदार यांनी केले तर सूत्रसंचलन व आभार प्रा. एफ.एस.
यमगर यांनी व्यक्त केले. यावेळी संस्थेतील विभागप्रमुख , अधिकारी, कर्मचारी व
विद्यार्थी उपस्थित होते.