उस्मानाबाद,दि 2 :- वि.वा शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा
जन्मदिन 27 फेबु्रवारी हा मराठी भाषा गैरवदिन
म्हणून साजरा करण्यात
येतो. यांचे औचित्य साधून जिल्हा
ग्रंथालय अधिकारी कार्यालय, येथे वि.वा.
शिरवडकर यांनी लिहिलेल्या
तसेच नामवंत लेखकाच्या दर्जेदार ग्रंथाचे ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले.
ग्रंथ प्रदर्शनाचे
उदघाटन उस्मानाबाद नगरपरिषद चे
नगरध्यक्ष मकरंदराजे निबांळकर यांच्या शुभ हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेस
पुष्पहार अर्पण करुन दिपप्रज्वलनाने करण्यात आले, ग्रंथ प्रदर्शन वाचकासाठी
खुली करण्यात आले. या ग्रंथ प्रदर्शन उदघाटन प्रसंगी जिल्हा ग्रंथालय अधिकारी
प्रशांत पाटील, एमएसईबी चे श्री रमेश पवार,ह. रा. डेंगळे, ही.भ. बिराजदार
तसेच अंकुर सोनटक्के, लोमटे सर, सुधीर
सराव, वाघमारे,सुभाष पाटोळे, श्रीधर पवार,
अर्जून मुळे, गोपाळ अहंकारी व वाचक
बहुसंखेने उपस्थित होते.