उस्मानाबाद,दि.3:-महाराष्ट्र उद्योजकता विकास
केंद्र,उस्मानाबाद द्वारे आयेजित कार्यक्रम समन्वयक या पदाकरीता प्रशिक्षण
कार्यक्रमाचे आयेजन जिल्हा उद्योग केद्र येथे करण्यात आले आहे.
दि. 7
ते 11 मार्च 2017 या कालावधीमध्ये
घेण्यात येणार असून
यामध्ये नावीन्यपूर्ण उपक्रम घेतले
जाणार आहेत. यामध्ये
कार्यक्रम आयोजकांच्या कामाचे
महत्त्व सिध्द करण्यात येईल, व्यक्तीमत्तव विकास, संवाद
कौशल्य, देहबोल, सुसूत्रता, सूत्रसंचलन, इव्हेन्ट मॅनेजमेंट, व्सासपीठ सजावट, कात्रणसेवा डाक्यूमेंटेशन , व्यवसाय मार्गदर्शन,
कार्यक्रमाचे नियोजन, उद्योगाचे
व्यवस्थापन,अकाउन्ट, आभार प्रदर्शन
इत्यादी विषयावर तज्ञ व अधिकारी
वर्गाकडून मार्गदर्शन करण्यात
येणार आहे.
या प्रशिक्षणासाठी शैक्षणिक
पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर,एम. बी. ए. , एम. एस. डब्लू,
वयोमर्यांदा 18 ते 35 वर्ष असून, अधिक
माहिती व प्रवेश अर्जासाठी कार्यक्रमाचे आयोजक
श्री. प्रकाश पवार मो. नं. 9604143488 यांच्याशी जिल्हा
उद्योग केंद्र, येथे संपर्क साधावा, असे आवाहन
प्रकल्प अधिकारी श्री. पांडुरंग मोरे
यांनी केले आहे.