उस्मानाबाद,दि.4:-राष्ट्रीय
विधी सेवा प्राधिकरण,नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार जिल्हयातील सर्व न्यायालयात
दि.8 एप्रिल 2017 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. संबंधीत
पक्षकारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या कडून
करण्यात आले आहे.
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये
भु-संपादन प्रकरणे,मोटार अपघात तथा कामगार नुकसान भरपाई प्रकरणे,दिवाणी प्रकरणे,तडजोडपात्र
फौजदारी, कौटुंबिक वाद,कलम 138 एन.आय.ॲक्टप्रमाणे असलेली प्रकरणे, वादपूर्व
प्रकरणे ज्यामध्ये बँकेची व नगर पालीकेची पाणीपट्टी ची प्रकरणे आदी प्रकरणे
सामोपचाराने व तडजोडीने मिटविण्याकरीता ठेवण्यात येणार आहेत.
तरी संबंधीत पक्षकारांनी याचा लाभ घ्यावा आणि
त्यांची प्रलंबीत असलेली प्रकरणे सामोपचाराने आणि तडजोडीने मिटवून घ्यावेत, असे
आवाहन दिवाणी न्यायाधीश तथा सदस्य सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी केले आहे.