Monday, 7 November 2016

‘जय महाराष्ट्र’ मध्ये ‘वाचन संस्कृती’


            मुंबई, दि. 7 : तरुणांमध्ये वाचनाची आवड कशा प्रकारे निर्माण करता येईल, लहान मुलांवर बालपणापासूनच कशा प्रकारे वाचनाचे संस्कार रुजवायला हवेत, वाचन संस्कृती वाढविण्यासाठी पालक आणि शिक्षकांची भुमिका कशी असायला हवी, आजची पिढी इंग्रजी शिक्षणाकडे वळत असताना मराठी भाषा जतन करण्याकरिता काय केले पाहिजे  याविषयी सविस्तर माहिती  ज्येष्ठ मराठी भाषा अभ्यासक अभिराम भडकमकर यांनी मुलाखतीमध्ये दिली आहे. ही मुलाखत सूत्रसंचालक उत्तरा मोने यांनी घेतली आहे.
             माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही विशेष मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि. 08 नोव्हेंबर 2016 रोजी सायंकाळी 7.33 ते 8.15 या वेळेत प्रसारित होणार आहे.