उस्मानाबाद, दि.9:-
अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने 500 व 1000
रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय
नुकताच घेतला आहे. जिल्हयातील ग्राहकांस व सर्वसामान्य नागरिकांस चलनी नोटांच्या
आर्थिक व्यवहारासाठी जिल्हयातील सर्वच राष्ट्रीयकृत, जिल्हा,नागरी बॅंक, व संबंधित
सहकारी बँकांनी सहकार्याची भूमिका ठेवून व्यवहार करावेत, असे अप्पर जिल्हाधिकारी
अविनाश पाठक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात चलनी नोटांच्या अनुषंगाने
बैठकीत आवाहन केले.
या बैठकीस जिल्हयातील राष्ट्रीयकृत
बँकांचे व्यवस्थापक, लिड बँक, जिल्हा बँक, जिल्हा ग्रामीण बँक सहकारी बँकेचे
व्यवस्थापक, प्रतिनिधी तसेच प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी आयुषकुमार प्रसाद, निवासी
उपजिल्हाधिकारी सुनिल यादव ,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एकनाथ माले, जिल्हयातील
पेट्रोल पंपचालक, पोष्ट मास्तर, रेल्वे अधिकारी, तसेच मेडीकल दुकांनाचे प्रतिनिधी
मोठया संख्येने उपस्थित होते.
या
बैठकीस मार्गदर्शन करताना अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक म्हणाले की, सर्व बँकांनी
आपआपल्या बँकांचे अतिरिक्त काऊंटर्स सुरू करावेत. जेष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र
व्यवस्था करावी तसेच प्रत्येक व्यक्तीस सामंजस्याने वागणूक दयावी, बँकेत गर्दी
वाढणार आहे, लॉकर ऑपरेशन, लोड वाढू शकतो,हे लक्षात घेवून बँक व्यवस्थापकांनी योग्य
ती काळजी घ्यावी ,प्रत्येक ग्राहकास पावती देण्यात यावी, ग्राहकांचे ऑनलाईन
व्हेरीफिकेशन करुन घ्यावे, राष्ट्रीकृत बँकांनी सी.डी. एम. चालू ठेवावेत, पेट्रोल
पंपचालकांचे पैसे बँकेने स्विकारावेत तसेच ग्राहकांनी आर.टी.जी.एस व एन.एफ.टी
व्दारे आर्थिक व्यवहार करावेत, गरज पडल्यास पेट्रोल पंप, पोस्ट ऑफीस व बँकांना
पोलीस संरक्षण देण्यात येईल, असेही यावेळी अप्पर जिल्हाधिकारी यांनी
सांगितले.
स्टेट बँक हैद्राबाद एक कॅश व तीन रिसिप्ट
काऊंटर्स चालू ठेवणार आहेत, स्टेट
बॅक ऑफ इंडिया एक कॅश व दोन रिसिप्ट काऊंटर्स
चालू ठेवणार आहेत, महाराष्ट्र बँक
एक कॅश दोन रिसिप्ट ठेवणार असून उर्वरित
बॅकांनी ग्राहकांसाठी काऊन्टर्स वाढवावेत, अशी सूचना केली. या सर्व कामकाजात
सुसूत्रता निर्माण व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

