उस्मानाबाद,दि:10- जिल्हा वार्षिक योजनेंकरिता
प्रशासकीय मान्यता व इतर बाबीकरिता राज्यस्तरीय यंत्रणा व जिल्हा परिषद यंत्रणाकरिता
स्वतंत्र संगणक आज्ञावली तयार करण्यात आली
असून या संगणक आज्ञावलीचे प्रशिक्षण वेबप्रो
कंपनीचे टेक्निशिअन विशाल देशमुख यांनी
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात दिले .
या संगणक अज्ञावली प्रशिक्षणास सहायक जिल्हा
नियोजन अधिकारी सोमनाथ रेडडी, पांडुरंग गोडसे, मुख्य लेखा व वित्त् अधिकारी श्री.शेखर
शेटे, लेखाधिकारी जिल्हा नियोजन समिती डि.एम.कुलकर्णी , जिल्हा परिषदचे लेखाधिकारी
आर.यु.शिंदे, सहायक लेखाधिकारी वित्त श्री. सु. धो. सोनवणे, लेखाधिकारी जिल्हा
ग्रामीण विकास यंत्रणाचे बि.ए.गुणाले,जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील,
जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्यासह जिल्हातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख
उपस्थित होते.


