उस्मानाबाद,दि.10:जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांतर्गत जिल्हयामध्ये उस्मानाबाद व नळदूर्ग ता.तुळजापूर येथे जिल्हयातील ग्रामीण भागातील
दारिद्रयरेषेतील तसेच बिगरदारिद्रय रेषेखालील कुटुंबियांच्या पाल्यांना प्रशिक्षण
घेता यावे या हेतूने शासनाने ट्रायसेम व
मिनी आय.टी.आय ही औद्योगिक प्रशिक्षण
केंद्रे चालू केलेली आहेत.
या औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामार्फत रेडिओ टी.व्ही.दुरुस्ती, इलेक्ट्रिक मोटार
रिवायडींग, वेल्डर, सूतारकाम या व्यवसायासाठी प्रशिक्षण दिले जाते .
या व्यवसायासाठी ग्रामीण भागातील दारिद्रयरेषेखालील 18
ते 35 वयोगटातील प्रत्येक 15 युवक-युवती
लाभार्थी प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले जाते. तसेच दारिद्रयरेषेखालील
प्रशिक्षणार्थी दरमहा रु.500/- विदयावेतन
दिले जाते व ही दारिद्रयरेषेखालील प्रशिक्षणार्थ्यांकडून प्रवेश शुल्क रु.50/- हत्यारसंच
हाताळणी शुल्क रु.50/- व मासिक प्रशिक्षण शुल्क दरमहा रु.50/- फीस आकारण्यात येते.
मिनी आय.टी.आय नुळदूर्ग ता.तुळजापूर व ट्रायसेम
प्रशिक्षण केंद्र उस्मानाबाद येथील सहा व नऊ महिन्याच्या कालावधील चार
व्यवसायाच्या प्रशिक्षणासाठी दारिद्रयरेषेखालील
तसेच बिगर दारिद्रयरेषेखालील 18 ते 35 या वयोगटातील उमेवारांनी संबंधित
गटविकास अधिकारी पंचायत समिती उस्मानाबाद यांच्याकडे वैयक्तीक माहितीसह अर्ज
(इयत्ता 10 वी, 12 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र, ग्रामसेवक यांचे दारिद्रयरेषेखालील
प्रमाणपत्र व प्रशिक्षणासाठी निवडलेला
ट्रेडचे नाव) दि. 31 डिसेंबर 2016 पर्यंत सादर करावेत, प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या
उमेदवारांना अधिक माहिती आवश्यक असल्यास संबंधित गटविकास अधिकारी पंचायत समिती
किंवा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,उस्मानाबाद येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा
ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका रूपाली सातपुते यांनी केले आहे.