उस्मानाबाद,दि.01:- जिल्हाधिकारी
कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी
निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी
जिल्हाधिकारी श्री. राधाकृष्ण गमे, निवासी
उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी, अविनाश पाठक, प्रभोदय मुळे,
शिल्पा करमरकर, सचिन बारवकर, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, तहसिलदार सुजित नरहरे
यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.