उस्मानाबाद, दि. 03:- खाजगी
विद्यार्थ्यांनी 12 साठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरावयाचे आहेत, ऑफलाईन
अर्ज स्विकारला जाणार नाही असे विभागीय सचिव, विभागीय मंडळ, लातूर यांनी
प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
विद्यार्थ्यांनी
नावनोंदणी अर्ज दि. 31 जुलै 2017 ते दि. 21 ऑगस्ट 2017 या कालावधीत ऑनलाईन अर्ज
भरावयाची आहेत. भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून दि. 01 ऑगस्ट 2017 ते दि. 23 ऑगस्ट
2017 या कालावधीत विहीत शुल्क व कागदपत्रांसह अर्जावर नमूद केलेल्या कनिष्ठ
महाविद्यालयामध्ये जमा करावी. संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्याकडे
प्राप्त सर्व अर्ज यादी व शुल्कासह दि. 28 ऑगस्ट 2017 पर्यंत जमा करावेत. प्रत्येक
विद्यार्थ्याने ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी http://form17.mh-hsc.ac.in
या वेबसाईटचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर मराठी/ इंग्रजी
मधून उपलब्ध आहेत त्या वाचून अर्ज भरावा असे विभागीय सचिव, विभागीय मंडळ, लातूर
यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.