Thursday, 3 August 2017

जिल्हाधिकारी कार्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन


उस्मानाबाद,दि.01:- जिल्हाधिकारी कार्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील यांची 117 वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या हस्ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. 

            यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, सचिन बारवकर, जिल्हा सुचना विज्ञान केंद्राचे सहाय्यक पुरुषोत्तम रुकमे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.