Tuesday, 1 August 2017

महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी यांच्या हस्ते डिजीटल 7/12 चे वाटप



उस्मानाबाद,दि.01:- जिल्हाधिकारी कार्यालयात 01 ऑगस्ट महसूल दिनानिमित्त राष्ट्रीय भूमी अखिलेख आधुनिकीकरण योजनेंतर्गत डिजीटल 7/12 चे वाटप जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांनी केले.
          उस्मानाबाद तालुक्यातील सुर्डी, किणी, बुकनवाडी, कावळेवाडी, कोळेगाव, वाखरवाडी, घाटंग्री, देवळाली, खामसवाडी येथील खातेदारांना प्रातिनिधीक स्वरुपात डिजीटल 7/12 जिल्हाधिकारी यांच्या हस्ते वाटप करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी यांनी उपस्थित खातेदारांशी संवाद साधला.
          यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी, अविनाश पाठक, प्रभोदय मुळे, शिल्पा करमरकर, सचिन बारवकर, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, तहसिलदार सुजित नरहरे, मंडळ अधिकारी नाईकनवरे, चौरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.