Thursday, 3 August 2017

शेतकऱ्यांना 10 हजार रुपयाचे कर्ज तात्काळ देण्याचे शासनाचे निर्देश


उस्मानाबाद, दि. 03:- जिल्हयातील शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी निविष्ठा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने दि. 30 जून 2016 रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना शासन हमीवर 10 हजार रुपयाचे कर्ज तातडीने देण्याचे निर्देश सर्व राष्ट्रीयकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाना शासन निर्णय 14 जून 2017 व शुध्दीपत्रक दि. 20 जून 2017 नुसार प्रापत झालेले आहेत.  
            शासन निर्णय 28 जून 2017 अन्वये राज्यातील शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 राबविणे बाबत निर्णय घेतला आहे. त्यानुसार उस्मानाबाद जिल्हयातील सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी शासन निर्णयानूसार खरी पिकासाठी 10 हजार रुपयाचे तातडीचे कर्ज घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह आपले गाव दत्तक असलेल्या राष्ट्रीयकृत/ग्रामीण/जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत संपर्क साधावा तसेच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 चे विहीत नमुन्यातील कर्जमाफीचे अर्ज, सर्व सहाय्यक निबंधक कार्यालय, तहसील कार्यालय, गटविकास अधिकारी कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, सर्व ग्रामपंचायत, सर्व विकास सेवा सहकारी संस्था, सर्व बँका व CSC,SPV केंद्रावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा उपनिंबधक सहकारी संस्था कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आलेल आहेत. सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी सहाय्यक निंबधक सहकारी संस्था व त्यांचे कार्यालयातील क्षेत्रिय अधिकारी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे.

            कर्जमाफीचे अर्ज ऑनलाईन भरताना येणाऱ्या अडचणी संदर्भात शेतकऱ्यांनी नोडल अधिकारी यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा उपनिंबधक सहकारी संस्था, उस्मानाबाद यांनी केले आहे.