Thursday, 3 August 2017

खाजगी विद्यार्थ्यांनी 10 वी साठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन भरावेत


उस्मानाबाद, दि. 03:- मार्च 2018 साठी माध्यमिक शालान्त परीक्षेस खाजगीरित्या प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी 10 साठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरावयाचे आहेत, ऑफलाईन अर्ज स्विकारला जाणार नाही असे विभागीय सचिव, विभागीय मंडळ, लातूर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

            खाजगी विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी अर्ज क्रं. 17 ऑनलाईन पध्दतीने भरण्याबाबत सूचना काढून आपल्या माध्यमिक शाळेमार्फत याबाबतची सविस्तर माहिती द्यावी. विद्यार्थ्यांनी नावनोंदणी अर्ज दि. 31 जुलै 2017 ते दि. 21 ऑगस्ट 2017 या कालावधीत ऑनलाईन अर्ज भरावयाची आहेत. भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून दि. 01 ऑगस्ट 2017 ते दि. 23 ऑगस्ट 2017 या कालावधीत विहीत शुल्क व कागदपत्रांसह अर्जावर नमूद केलेल्या शाळेमध्ये जमा करावी. संबंधित संपर्क केंद्रांनी त्यांच्याकडे प्राप्त सर्व अर्ज यादी व शुल्कासह दि. 28 ऑगस्ट 2017 पर्यंत मंडळाकडे जमा करावेत. प्रत्येक विद्यार्थ्याने ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी http://form17.mh-ssc.ac.in या वेबसाईटचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर मराठी/ इंग्रजी मधून उपलब्ध आहेत त्या वाचून अर्ज भरावा असे विभागीय सचिव, विभागीय मंडळ, लातूर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.