उस्मानाबाद.दि.4:- राज्याच्या
पहिल्या नगर विकास दिनानिमित्त उस्मानाबाद नगरपरिषदेला शासनाच्या नगरविकास
विभागामार्फत उत्कृष्ट नगरपरिषद पुरस्कार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या हस्ते आज मुंबई येथे देण्यात आला.
मुंबई येथे यशवंतराव चव्हाण
प्रतिष्ठाण सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उस्मानाबाद नगरपरिषदेला उत्कृष्ट नगरपरिषद पुरस्कार
देण्यात आला.हा पुरस्कार नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर व नगरपरिषदेचे
मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांनी स्वीकारला.यावेळी खासदार प्रा.रविंद्र
गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
उस्मानाबाद नगरपरिषदेला 'अ'वर्ग
नगरपालिकेमध्ये औरंगाबाद विभागात प्रथम पुरस्कार मिळाला असून या पुरस्काराचे
स्वरूप चार कोटी रुपये व सन्मानपत्र असे आहे.
शासनाच्या नगरविकास विभागामार्फत
राज्याचा पहिला नगरविकास दिन म्हणून 20 एप्रिल ला साजरा केला जात आहे, त्यानिमित्त
हा पहिला पुरस्कार देण्यात आला आहे.
