उस्मानाबाद
दि.३०:- शटल बस ला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून राज्यात सर्वच मार्गावर
दर वीस,तीस व लांब पल्ल्याच्या मार्गावर ४५ मिनिटांनी शटल बस सुरु करण्यात येतील,
अशी ग्वाही परिवहन मंत्री तथा पालकमंञी दिवाकर रावते यांनी दिली.वाशी येथील बस
स्थानकाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
महाराष्ट्र
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उस्मानाबाद विभागांतर्गत येणाऱ्या वाशी येथील बस
स्थानकाचे उदघाटन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी
खासदार प्रा. रविंद्र गायकवाड, माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळर ,ज्ञानेश्वर
पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल खोचरे,प्रभारी जिल्हाधिकारी अविनाश
पाठक,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते,एसटी महामंडळाचे
औरंगाबाद विभागाचे उपमहाव्यवस्थापक श्री.पठारे, विभाग नियंत्रक राजीव साळवे, विभागीय वाहतूक नियंत्रक अमोल गोंजारी
आदीची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे
बोलताना पालकमंत्री श्री. रावते म्हणाले की, ६६ वर्षापासून चालत आलेली एसटी ची
पूर्वापार परंपरा मोडीत काढून नवीन कृती आणायची आहे, यासाठी एसटी बसचा रंग बदलला
जाणार, ग्रामीण भागात शिवशाही ही वातानूकुलित बस सेवा सुरु करण्यात येणार,कर्मचाऱ्यांचा
ड्रेस बदलणार असून हळूहळू परिर्वतन होणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर
बसस्थानकाला अत्याधुनिक रुप देण्यासाठी ५० स्थापत्यशास्त्रज्ञांची नेमणूक करण्यात आली असल्याचे सांगितले.
चालक,वाहकांना आगाराच्या ठिकाणीच
निवासस्थान,कर्मचाऱ्यांच्या मुलींच्या भविष्यासाठी आर्थिक तरतूद, पुणे येथे
मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, अभियांत्रिकी महाविद्यालयय आदी योजना हाती घेण्यात
आल्या असून कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी प्रयत्न करणार असल्याच्या त्यांनी यावेळी
विश्वास व्यक्त केला.