उस्मानाबाद.दि.30:-
कळंब तालुक्यातील पाथर्डी येथे ग्रामपंचायत मार्फत सुरु केलेल्या एटीएम आरओ
प्लँटचे उदघाटन व लोकार्पण परिवहन,खारभूमी विकास मंञी तथा पालकमंञी श्री. दिवाकर
रावते यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आयोजित कार्यक्रमात पालकमंञी
श्री.रावते यांच्या हस्ते हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कन्यारत्न स्वागत
योजनेंतर्गत या वर्षी जन्मलेल्या मुलींच्या नावे मुदत ठेव प्रमाणपत्राचे स्वप्निल पिंगळे,
सुरेकांत पिंगळे, रेवननाथ काकडे, यशवंत जाधव, अंकुश पवार, बालाजी पिंगळे आदीना
वाटप करण्यात आले.
पालकमंञी
श्री.रावते यावेळी म्हणाले की, हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कन्यारत्न
स्वागत योजना ही मुलीच्या जन्माचे स्वागत करणारी योजना असून ही योजना संपूर्ण
राज्यात राबविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील.
यावेळी खासदार
प्रा.रविंद्र गायकवाड, माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळर, माजी आमदार ज्ञानेश्वर
पाटील,प्रभारी जिल्हाधिकारी अविनाश पाठक,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
आंनद रायते,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी शितलकुमार मुकणे,विभागीय वन अधिकारी
राजेश्वर सातेलीकर, तहसिलदार अशोक नांदलगावकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल
खोचरे, उपजिल्हाप्रमुख अजित पिंगळे,सरपंच रंजनाताई पिंगळे आदी उपस्थित होते.