उस्मानाबाद.दि.4:- माहे जून ते सप्टेंबर 2017 या
कालावधीत मुदत संपणाऱ्या, तसेच विभाजनामुळे अस्तित्वात आलेल्या स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या
सार्वत्रिक व पोट निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र
यांनी घोषित केलेला आहे.त्यानुसार संबंधित तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या
सार्वत्रिक व पोट निवडणुकीची निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे. आदर्श
आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित तालुक्याचे गट विकास
अधिकारी यांची आचारसंहिताप्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
संबंधित
गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिनस्त
ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीत आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची
दक्षता घ्यावी तसेच राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी वेळोवेळी दिलेले
निर्देश,आदेशानुसार योग्य ती कार्यवाही करावी, संबंधित तहसिलदार यांना निवडणूक कामी
योग्य ते सहकार्य करावे, असेही कळविण्यात आले आहे.