उस्मानाबाद.दि.4:-
विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखाली दि.5 मे 2017 रोजी दुपारी
1 वाजता जिल्हयातील सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी छत्रपती शिवाजी
महाराज नाटयगृह,नगरपरिषद उस्मानाबाद येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
खरीप हंगामाबरोबरच राज्याच्या सर्वांगीण
विकासाच्या दृष्टीकोनातून राबविण्यात येत असलेल्या केंद्र व राज्य शासनाच्या विविध
उपक्रम व योजनांचे दि.31 मे 2017 अखेर पर्यंत नियोजन करुन प्रत्यक्ष अंमलबजावणी
करणेबाबत या कार्यशाळेत मार्गदर्शन
करण्यात येणार आहे. तसेच विविध प्रशासकीय विभागा्रच्या कामकाजाचा आढावाही घेण्यात
येणार आहे.
या कार्यशाळेत जिल्हाधिकारी, अतिरिक्त
जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय अधिकारी,उप
विभागीय कृषी अधिकारी, सर्व तहसिलदार, सर्व गट विकास अधिकारी, सर्व तालुका कृषी
अधिकारी, सर्व कृषी सहाय्यक, सर्व ग्रामसेवक, सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, जिल्हा
प्रशासन अधिकारी, सर्व मुख्याधिकारी नगरपालिका/नगरपंचायत असे विविध विभागांचे
प्रमुख व त्यांचे सहाय्यक अधिकारी उपस्थित राहणार आहेत.