उस्मानाबाद.दि.4:- नगर विकास
दिनानिमित्त औरंगाबाद (मराठवाडा) विभागातून "क" वर्ग नगरपरिषदेमधून एक उत्कृष्ट
नगरपरिषद म्हणून तुळजापूर नगरपरिषदेची निवड प्रथम झाली असून मुख्यमंत्री श्री.
देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत मानपत्र,पुरस्कार आणि 2.5 कोटी निधीचा धनादेश
तुळजापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री. पंडितराव जगदाळे आणि मुख्याधिकारी श्री.
राजीव बुबने यांनी स्वीकारला.
