उस्मानाबाद,दि.12:-
सैन्य व पोलीस दलात भरती होवू इच्छिणा-या युवकांसाठी प्रशिक्षण देवून भरती
योग्य बनविण्यासाठी महाराष्ट्र शासन अंगिकृत महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाद्वारे (मेस्को) संचलित, मेस्को करीअर कॅडमी, करंजे नाका, सातारा
येथे कार्यरत आहे.
सैन्य व पोलीस भरती प्रक्रियेबाबत मार्गदर्शन
व शिबिरासाठी उमेदवारांची निवड करण्यासाठी मेस्को करीअर अॅकडमीचे प्रतिनिधी उस्मानाबाद
येथील सैनिकी मुलांचे वसतीगृह , खाजानगर येथे दिनांक 25
जानेवारी 2017
रोजी भेट देणार आहेत.
या प्रशिक्षणाचा समाजाच्या सर्व स्तरातील सर्व युवकांसाठी
असून उस्मानाबाद जिल्हयातील इच्छूक व पात्र उमेदवारांनी दिनांक 25 जानेवारी 2017 रोजी
सकाळी 10.00 वाजता, सैनिकी मुलांचे वसतिगृह, खाजानगर, उस्मानाबाद येथे निवड चाचणीसाठी शैक्षणिक प्रमाणपत्र व
गुणपत्रकांसह हजर राहून या योजनेचा लाभ
घ्यावा. निवड चाचणीनंतर पात्र ठरलेल्या युवकांना प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जाईल.
प्रवेश दिलेल्या युवकांनी प्रवेश शुल्क रक्कम रु 200/- त्वरीत भरुन शिबिरातील आपला
प्रवेश प्रवेश निश्चित करावा.
उर्वरित मासिक शुल्क रूपये 6
हजार 300 प्रवेशाची वेळी भरावी. काही अपरिहार्य कारणामुळे जे उमेदवार निवड
चाचणीसाठी हजर राहु शकत नाहीत ते मेस्को करीअर अॅकडमी, सातारा येथे येऊन थेट
प्रवेश घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी सकाळी 10 ते
सायंकाळी 4 या वेळात मोबाईल क्रमांक 9168986864 किंवा 7588624043 वर संपर्क
साधावा, तसेच महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ व मेस्कोच्या
(www.mescoltd.co.in) या संकेतस्थळास भेट
दयावी असे, आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबाद यांनी केलेले आहे.