शिक्षक
मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम-2017
उस्मानाबाद, दि.13:- भारत
निवडणूक आयोगाने दि.4 जानेवारी 2017 रोजी शिक्षक मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम-2017 घोषित
केलेला आहे. या कालावधीत आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने तसेच कायदा व
सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून सद्य:परिस्थितीत एकतर्फी आदेश काढणे आवश्यक असल्याची
खात्री झाली असल्याचे अप्पर जिल्हाधिकारी,उस्मानाबाद
यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे .
त्याअर्थी
अपर जिल्हाधिकारी ,उस्मानाबाद यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144
अन्वये त्यांना प्रधान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन शिक्षक मतदारसंघ निवडणूक
कार्यक्रम ज्या कालावधीसाठी घोषीत केलेला
आहे. त्या कालावधीत सहाय्यक जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाच्या परिसरात निवडणूक आचारसंहिता संपेपर्यंत, मतदार
केंद्राचे परिसरात मतदान दिवशी तसेच मत मोजणी
केंद्राच्या परिसरात दि.12 जानेवारी ते दि.9 फेबु्वारी 2017 पर्यंत
100 मीटरच्या परिसरात बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.
या
आदेशाचा भंग केल्यास ती व्यक्ती भारतीय
दंड संहिता कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र होईल, हे आदेश शासकीय कर्तव्ये पार
पाडणाऱ्या व्यक्ती , दंडाधिकारीय शक्ती प्रदान केलेले अधिकारी, पोलीस अधिकारी/
कर्मचारी, यांना वगळून लागू राहतील,
हे
आदेश उस्मानाबाद जिल्हयासाठी दि. 12 जानेवारी 2017 ते निवडणूक आचारसंहिता संपेपर्यंत
अंमलात राहतील. ****