उस्मानाबाद,
दि.12:- जिल्हा माहिती कार्यालय , नेहरु युवा केंद्र , जिल्हा क्रीडा कार्यालय ,
परिवहन विभाग, जिल्हा रुग्णालय, ग्रंथालय विभाग, स्वच्छता मिशन तसेच जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य विभाग
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या “लोकराज्य युवा दौड -2017”
हा उपक्रम राज्यातील उस्मानाबाद पॅटर्न ठरेल असे प्रतिपादन अतिरिक्त पोलीस अधीक्षक
डॉ . दीपाली घाटगे यांनी केले .
आज
उस्मानाबाद जिल्ह्यात पोलीस मुख्यालय परिसरात स्वामी विवेकानंद जयंती , माँ जिजाऊ
जयंती व राष्ट्रीय युवक दिन सप्ताहानिमित्त लोकराज्य युवा दौड या कार्यक्रमाचे
हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन प्रसंगी डॉ. घाटगे बोलत होत्या . या कार्यक्रमास
प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद , नेहरु युवा केंद्राचे समन्वयक विनायक धेंडे, जिल्हा क्रीडा अधिकारी
संजय महाडीक , अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गलांडे, उप प्रादेशिक परिवहन
अधिकारी विलास कांबळे , सहायक मोटार वाहन निरीक्षक श्री. मोडक, श्री. सांगळे, स्थानिक गुन्हे
शाखेचे पोलीस निरीक्षक हरीश खेडकर , शिक्षण विभागाचे प्रतिनिधी ,शहर वाहतूक
विभागाचे पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील,
रमाकांत गायकवाड आणि त्यांचे सहकारी, ज्येष्ठ पत्रकार मोतीचंद बेदमुथा तसेच इतर
पत्रकार आदी उपस्थित होते.
लोकराज्य
युवा दौड 2017 कार्यक्रमापूर्वी “स्वच्छ भारत” अंतर्गत स्वच्छतेची शपथ घेऊन “लोकराज्य
युवा दौड”
प्रारंभ करण्यात आली व लोकराज्य घरोघरी पोहचविण्याचा संकल्प केला. या युवा दौडमध्ये प्रामुख्याने प्रशिक्षणार्थी
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप,नेहरु युवा
केंद्राचे विकास कुलकर्णी तसेच पोलीस भरती
पूर्व प्रशिक्षण घेणारी कुमारी सुनिता राजेंद्र पवार,कुमारी निता विठ्ठल पवार,
क्रीडा विभागाच्या नेहरु युवा केंद्राच्या विद्यार्थींनीनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून
उस्मानाबादकरांची मने जिंकली .
यावेळी
मार्गदर्शन करताना डॉ.दीपाली घाटगे म्हणाल्या की, जिल्हा माहिती कार्यालय व इतर शासकीय
विभागांच्या समन्वयाने आयोजित केलेली “लोकराज्य युवा दौड 2017”
हा कार्यक्रम स्तुत्य असून यापासून आपण सर्व काही तरी चांगले शिकत आहोत.
शासनाच्या विविध विभागांनी असेच सामूहिक
कार्यक्रम घेतल्यास जनतेची कोणतीही कामे सहज होण्यास मदत होते.भविष्यात अशा
कार्यक्रमात पोलीस विभागही आपल्यासोबत हिरीरीने सहभाग नोंदवेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली .
साधारणत:
अडीच कि.मी.ची लोकराज्य युवा दौड 2017 ही पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानापासून
ते शिवाजी चौक, आंबेडकर चौक, समता कॉलनी, सह्याद्री कॉर्नर, कोहिनूर हॉटेल ते
पोलीस अधीक्षक कार्यालय मैदानावर सांगता समारंभासाठी आला. यावेळी जिल्हा माहिती
अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी लोकराज्य युवा दौड 2017 कार्यक्रमाची रुपरेषा विशद
करुन उस्मानाबाद जिल्हा हा प्रशासनात
सर्वांचा संवाद घडवून आणणारा जिल्हा म्हणून पुढे येत आहे,असे म्हणून“लोकराज्य
मासिका”चे महत्व पटवून दिले. जिल्ह्यातील प्रत्येक
व्यक्तीने अधिकारी, कर्मचाऱ्यांनी समयसूचकतेचे भान ठेवून अचूक प्रसंग दाखवून निर्णय घ्यावा तसेच सर्वांनी
मिळून एकत्रितपणे निर्णय घेतल्यास कोणतेही न होणारे काम सहज होते. यासाठी सर्वांनी
प्रशासनात एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.
यावेळी
शहर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील म्हणाले की , जिल्हा माहिती
कार्यालय व इतर सर्वच विभागांनी हा लोकराज्य युवा दौड कार्यक्रमात तीन संदेश एकाच वेळेस देऊन साध्य केले आहे,असे
विशद करुन कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. यावेळी नेहरु युवा केंद्राचे समन्वयक विनायक
धेंडे, जिल्हा क्रीडा अधिकारी संजय महाडीक यांचे शुभेच्छापर भाषणेही झाली.
“लोकराज्य युवा दौड 2017”
या कार्यक्रमात जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद यांची 108 क्रमांकाची रुग्णवाहिका वैद्यकीय अधिकारी डॉ.महेश घोळवे व
रुग्णवाहिकाचालक श्री.शहाजी इंगळे यांनी या रुग्णवाहिकेवरुन विविध शासकीय विभागांची माहिती
ध्वनीक्षेपकाद्वारे देण्यात आली.
चारचाकी वाहनांनी सीट बेल्ट लावूनच वाहने चालवावीत याबाबत जनतेमध्ये जागृती
वाढावी यासाठी या मोहीमेत उस्मानाबाद येथील शाळेतील विद्यार्थ्यांच्या स्कूल
बसनेही सहभाग नोंदविला आणि या मोहीमेचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिरवी
झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.यावेळी परिवहन विभागाचे वाहने तसेच कुलकर्णी
ड्रायव्हिंग स्कूल व इतर ड्रायव्हिंग स्कूल यांनीही सहभाग नोंदविला .
शेवटी
जिल्हा माहिती अधिकारी श्री. सानप यांनी
जिल्ह्यातील सर्व विभागांचे आभार व्यक्त करुन कार्यक्रम संपला असे जाहीर
केले .
****